साहित्य परिषदेची शताब्दी

नमस्कार.


मराठी साहित्याचा इतिहास ज्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही, अशी  साहित्यिक उपक्रम राबविणारी आद्यसंस्था "महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे "उद्या दि.२७ मे २००६ रोजी आपला १०० वर्षांचा एक टप्पा पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.या संस्थेचे माझ्या माहितीनुसार सुमारे८००० सदस्य आहेत. संपूर्ण विश्वात ते पसरले आहेत. महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे मुखपत्रही असेच उत्तम साहित्यिक नियतकालिक मानले जाते. या साहित्य संस्थेच्या सदस्यांची नावे देणे म्हणजे अक्षरशः वेडेपणा ठरेल, कारण मराठीतील एकही साहित्यिक असा नाही की ज्याचा या संस्थेशी कधीच संबंध आला नाही.माझ्याप्रमाणेच अनेक मनोगतीही या संस्थेचे सदस्य असतील. एका उच्च दर्जाच्या मातृसंस्थेचे सदस्य असणे हे नक्कीच अभिमानाचे आहे. लोकमान्य टिळक या संस्थेच्या स्थापकांपैकी एक होते यातच सर्व काही आले.  या निमित्ताने  संस्थेच्या सर्व सदस्यांचे व संपूर्ण संस्थेचे एक सदस्य म्हणून हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा.

चित्रपट व क्रीडा क्षेत्रात आरक्षण

आरक्षणामुळे दुर्बल घटकांची प्रगती होऊन ते सक्षम व पर्यायाने देश प्रगत होणार असेल तर आरक्षण केवळ शिक्षण वा नोकरीमध्येच का असावे? चित्रपट व क्रीडा क्षेत्रात आरक्षण का नको?


चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथा, तांत्रिक बाबी, केशभूषा, वेशभूषा इत्यादी सर्व क्षेत्रात आरक्षण लागू करून दाखवावे, त्यायोगे सर्वत्र सरकारचे कौतुक होईल. तसेच क्रिकेट पासून ते टेनिस आणि धावण्यापासून ते नेमबाजी पर्यंत सर्व चमूंमध्ये ताबडतोब आरक्षण लागू करावे. नुसते आरक्षण लागू करून भागणार नाही तर नियमही बदलावे लागतील. उदाहरणार्थः जेव्हा आरक्षित फलंदाज फलंदाजी करेल तेंव्हा चौकार/ षट्काराची सीमारेषा आत घेतली जावी तसेच आरक्षित नेमबाज जेव्हा नेम बंदूक सरसावेल तेंव्हा लक्ष्याचा आकार वाढवला जावा.

हर एक बात पह कहते - १

हर एक बात पह कहते हो तुम कि तू कया है
तुमहीं कहो कि यह अनदाज़-ए गुफ़तगू कया है


दरवेळी म्हणतोस, की 'तू रे कोण'? ( तु काय मोठा लागून गेला आहेस अशा अर्थाने). ही का बोलण्याची रीत आहे? ग़ालिबला त्याच्या समकालिनांकडून मिळालेल्या टीकेला ग़ालिबचे यात उत्तर आहे असे वाटते.

उत्तरायण भाग-१

इतक्या सुंदर तरल भावनांना शब्दात कसं बांधशील?सारच कल्पनातीत!तुझ्या शब्दांच्या जादूने तु मला परत आपल्या जीवनातल्या नाजुक वळणावर घेऊन आलास आणि आपण दोघांनीहि हे उत्कट प्रेम अनुभवलं. मला तर हे वरदानच मिळाल होतं पण ही दुनिया तुझ्यासाठी खरंच अनपेक्षित होती.वयाच्या कोवळेपणात जे घडावं ते आता घडत होतं आणि या अकल्पित सत्यानं तु रंगुन गेला होतास.एक अजबशी दुनिया तु मला नजराणा म्हणुन बहाल केलीस आणि हातातुन निसटुन गेलेले हे सारे क्षण तु मला परत केलेस.एखाद्या भावविभोर मोरागत सारे इन्द्रधनुषी रंग तु उधळत होतास माझ्यावर.........

चांदणे शिंपीत जाशी

कविवर्य राजा बढे यांची चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ही कविता अर्थात आशा भोसले यांनी गायिलेले हे गीत नक्की कोण कोणास उद्देशून म्हणत आहे?


आपल्याला हे गीत चंद्राने पृथ्वीसाठी म्हटलेले प्रेमगीत वाटते का?

मटण मालवणी - २

वाढणी
५-६ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
90

जिन्नस

मधुमकरंदगड

यगिरीभ्रमणाची आवड असली तरी भर उन्हातली डोंगरयात्रा सहसा कोणाला आवडत नाही. त्यामुळे मग पहाटेचे छोटे वा रात्रीचे  किंवा दाट जंगलातले गिरीभ्रमण ठरवणे उन्हाळ्यात आवश्यक ठरते. असाच एक दाट जंगलातला दुर्ग म्हणजे मधु मकरंदगड.


महाबळेश्वर परिसरात सह्याद्रीच्या मुख्य रांगेभोवती अनेक उंच रांगांची दाटी झाली आहे. त्यातच दक्षिणेला कोयनानगर येथे अडवलेले कोयनेचे पाणी पार पासष्ट किमी मागे, म्हणजे महाबळेश्वराच्या पायथ्याच्या तापोळ्यापर्यंत दक्षिणोत्तर पसरले आहे. हा प्रचंड जलाशय आणि त्याच्या पश्चिमेकडची सह्याद्रीची भिंत यामधला प्रदेश हा आपोआपच दुर्गम आणि घनदाट जंगलाचा झाला आहे. याच्या दक्षिण टोकाला कोयनानगरच्या पलिकडे भैरवगड (सारंगगड) आहे आणि  मग जंगली जयगड, वासोटा, पर्वत, महिमंडणगड अशी एक से बढकर एक किल्ल्यांची रांग उत्तरेला महाबळेश्वराच्या पश्चिमेला असणाऱ्या मकरंदगडापर्यंत येते.