ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
सम्यक जीवनशैली परिवर्तनाचे तपशील जाणून घेण्यापूर्वी इथे, मनोगतावरच, आरोग्यसाधनेचे अनेक उत्तम उपाय चर्चिणारे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची यादी करून त्यांच्या उपयोगितेची चर्चा करावी हे ह्या लेखाचे प्रयोजन आहे.
बैठे काम आराम की हराम? हा लेख नुकताच 'अनु' ने लिहीला आहे. इतर अनेक मनोगतींनी आपापल्या परीने त्यात भर घातलेली आहे. मात्र बैठ्या जीवनशैलीवर उपाय शोधण्यासाठी वेळ, बुद्धी आणि कौशल्य खर्च करणाऱ्या अनुची मनःपूर्वक दाद दिली पाहिजे. जीवनातील खऱ्याखुऱ्या प्रश्नांचे स्वरूप समजून घेऊन त्यांच्या निरसनाचे उपाय वेळीच शोधणारे सारेच लोक कौतुकास पात्र आहेत. ह्या लेखातील बव्हंश उपाय विचारप्रवर्तक आणि लाभकारक आहेत.
आहारशास्त्र हा लेख 'अमित चितळे' ह्यांनी लिहीला आहे. त्यात कोणत्या अन्नपदार्थात काय मिळू शकेल हे त्यांनी प्रयत्नपूर्वक सारणीबद्ध केलेले आहे. त्यातील माहिती ही शाकाहाराबाबतचीच असली तरी तीच तर खरी उपयोगाची आहे. कारण मांसाहार आरोग्यकारक नाही. का? त्याची चर्चा 'आम्ही शाकाहारी??' नावाच्या 'योगेश पितळे' ह्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेच्या प्रस्तावात 'निरुभाऊ' ह्यांनी सोदाहरण केलेली आहे.
शाकाहार का घ्यावा? इथे 'निरूभाऊ' ह्यांनी शास्त्रीय दुवे देऊन शाकाहाराचे महत्व पटवून दिलेले आहे. त्यांच्या बिनतोड मुद्द्यांची दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. मात्र निःसंदिग्ध विचार करणारे बऱ्यावाईटाचा निर्णय कसा सत्वर करतात हे त्यांच्या लिखाणातून प्रत्यही जाणवत राहते.
रागनियमन हे मीच केलेले, 'मायबोली डॉट कॉम' ह्या संकेतस्थळावरील वरील एका उपयुक्त चर्चेचे संकलन आहे. रागावर नियंत्रण करता येईल का? कसे? हा विषय तिथे तपशीलवार चर्चिल्या गेलेला आहे. तणावमुक्ती आणि मनोव्यवस्थापनाचा हा एक महत्वाचा धडा आहे.
कल्पनाचित्रण ह्या लेखात माझ्या हृदयोपचारादरम्यान मी तयार केलेले एक कल्पनाचित्रण दिलेले आहे. मन सृजनात्मक चिंतनात कसे गुंतवावे ह्याबाबतचा हा एक प्रयत्न आहे.
आयुर्वेद आणि आपला आहार हा लेख 'सुखदा' ह्यांनी लिहिलेला आहे. अभ्यासपूर्ण आहे. तो लेख आणि त्यावरील सारीच चर्चा उद्बोधक आणि प्रस्तुत मालिकेसंदर्भात उपयोगाची आहे.
इतरही अनेक लिखाणांमध्ये आरोग्यविषयक माहिती आहे. पण ती विखुरलेली आणि अनिर्णयाक आहे.