सोनियाजींना शतकोटी प्रणाम

काल सोनिया देवींनी खासदारकीचा राजीनामा देऊन अजून एक मोठा त्याग करुन दाखवला आहे.


खरोखर सोनियाजी म्हणजे थोर आहेत. परमेश्वराने ही साध्वी बनवताना महात्मा गांधी, नेहरु, राजीवजी, संजयजी, इंदिराजी, गौतम बुद्ध, आंबेडकर, फुले, शिवाजी, शहाजी, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र, विवेकानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, राणा प्रताप, अकबर, अरविंद, बाबा आमटे, अशोक, चंद्रगुप्त ह्या सर्व लोकांचे सर्व गुण तर घातलेच आहेत. शिवाय पदरचे आणखी अगणित गुण घातले आहेत. (वरच्या यादीत काही थोर व्यक्ती वगळल्या गेल्या असतील तर क्षमस्व)



भारताचे नशीब थोर म्हणून अशी साध्वी भारताचे नेतृत्व करत आहे.
ह्या देवीच्या चरणी माझे अनंतकोटी प्रणाम. अजून कैक शतके ही साध्वी वा तिची अपत्ये आमचे नेतृत्व करोत हीच इच्छा.


अजि सोनियाचा दिनु वगैरे काव्ये ह्या सतीला उद्देशून रचलीत की काय असा संशय येतो. असो.