सावल्यांच्या पाऊलखुणा-भाग २

    सावल्यांच्या पाऊलखुणा-भाग २ 

         'ग्लोबल ट्राव्हल्स' आपल्याच ऑफिसच्या नेमप्लेटकडे पहाताना लू क्वांग छ्द्मीपणे हसला. नुकताच नूवर्क(न्युजर्सी) ते फिनिक्स(अरिझोना) प्रवास आटोपून एअरपोर्टवरून तो परतत होता. त्याने ऑफिसचे दार उघडले.    आतील गिऱ्हाईकांकडे व कर्मचाऱ्यांकडे त्याने ओझरता कटाक्ष टाकला.   आपल्या सेक्रेटरीला मागे येण्याची खूण केली. तिच्याकडून तीन दिवसाच्या गैरहजरीतील आढावा घेतला.   आपल्या खोलीतील आरामदायी खुर्चीवर त्याने स्वतःला झोकून दिले.

मका टोस्ट

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • ३ मक्याची कणसे,पाऊण कप दूध,पाऊण कप कॉर्न फ्लोअर ५/६ हिरव्या मिरच्या
  • लिम्बू ,मीठ, कोथिम्बिर , साखर ,चीज,मैदा ,तुप

मार्गदर्शन

कणीस उकडून व किसून घ्या. पाऊण चमचा मैदा तुपात भाजून घेणे.

दुध व तुप मैद्यात घाला. उकळी आल्यावर कणसाचा गोळा टाका.

त्यात मिरची  कोथिंबिर मीठ साखर लिंबू मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवावे. ब्रेड टोस्ट करून घ्या. त्यावर कणसाचा गोळा पसरावा.

परत ब्रेड कडक करून चिज किसून घालावे.

 

सरसगड - २

"हे हाऽय.." मागून कोणीतरी बोललं. वळून पाहिलं तर विजय.
"हाय. कधी आलास?"
"कधीचं सांगतोय तुला, पण गप्पांमधून तुझं लक्ष जाईल तर ना.."
"अरे.." मी काही बोलणार तेवढ्यात जीएस दिसले. "अरे ते बघा जीएससुद्धा आले.." असं म्हणत आम्ही सगळे जीएसकडे गेलो.
"सगळे लोकं अशा नजरेनी बघत आहेत जणू काही मी बसमधून जाण्यासाठी आलेल्या लोकांना फितवून माझी गाडी भरतो आहे !" या जीएसच्या प्रसंगनिष्ठ विनोदाला दिलखुलास दाद देत सर्वजण गाडीच्या दिशेने जायला लागले.

सावल्यांच्या पाऊलखुणा -भाग १

सावल्यांच्या पाऊलखुणा


           हिवाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ. झाडावर बर्फ विखुरले होते. आकाशात स्वच्छ चांदणे होते. काही पानांवर बर्फ वितळून पडणारे पाण्याचे थेंबच काय ते शांततेचा भंग करत होते. प्रत्येक थडग्यावर असलेला क्रॉस आणि काही थडग्यांजवळ असलेली फुले थंडीत कुडकुडत होती.  पायघोळ कोट आणि डोक्यावर हॅट घालून एक आकृती कारमधून उतरली. तिने खिशातून मोबाईल फोन काढला. वाहणारा गार वारा अंगाला झोंबत होता. त्या वक्तीला त्याची फारशी पर्वा नसावी. फोनवर बोलत झपाझप पावले टाकत ती व्यक्ती नोंदणी कार्यालयाकडे चालू लागली.  फोन बंद करून तिने परत खिशात ठेवला. चंद्राच्या प्रकाशात व्यक्तीची सावली पुढे सरकली. कार्यालयाचे दार वाजले.

सरसगड - १

"हॅलो"
"हॅलो जीएस, वेदश्री बोलतेय."
"हं बोल गं.. काय म्हणतेस?"
"उद्याच्या सरसगड ट्रेकला यायचं म्हटले तर परवानगी मिळेल का मला? नाही... इतक्या ऐनवेळेस विचारते आहे म्हणून म्हटलं.."
"परवानगीचं काय घेऊन बसलीस.. ये की.. किती जणं आहात तुम्ही?"
"मी तरी एकटीच येत आहे.

मुगाची धिरडी

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • दोन वाट्या हिरवे मूग, , , कोथिंबीर
  • १/२ वाटी उडीद डाळ
  • ९-१० पाकळ्या लसूण, ५-६ हिरव्या मिरच्या
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल

मार्गदर्शन

मुगाची हिरवी धिरडी - (चविष्ट आणि पौष्टिक)

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१)

                    ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    


अभंग # १.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥
पाठभेद...
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणे । द्वारकेचे राणे पांडवा घरी ॥

सिमलामसाला

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • सिमला उर्फ ढब्बू मिरची २ मोठ्या(जाड्या)
  • लाल तिखट १ चमचा, धने-जीरे पावडर १ चमचा, गरम/गोडा मसाला १ चमचा,
  • दाण्याचे कूट, ओला नारळ, चिरलेली कोथिंबीर प्रत्येकी अर्धी वाटी
  • चिंचेचा दाट रस अर्धी वाटी, गूळ (छोट्या लिंबाएवढा)
  • मीठ
  • तेल, मोहोरी, हिंग, हळद (फोडणीसाठी)

मार्गदर्शन

वातावरणीय अभिसरण -७- शेवट

वातावरणीय अभिसरण-७
विसाव्या शतकातील गरूडझेप - उत्तरार्ध


विसाव्या शतकात अस्तित्वात आलेल्या आणि हवामानशास्त्राच्या प्रगतीस मोठ्या प्रमाणात सहाय्यभूत ठरलेल्या तांत्रिक व तांत्रज्ञानिक प्रगतीचा थोडा आढावा घेऊ. संगणक आणि कृत्रिम उपग्रह ह्या दोन्ही तंत्रज्ञानांमुळे वातावरणीय अभिसरण समजण्यामधील प्रगती गेल्या काही वर्षांमध्ये आधीच्या काळाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात साध्य करता आली.