हे छायाचित्रण माझे नाही

छायाचित्रणाची वा त्याच्या आस्वादाची आवड असणाऱ्यांना त्यांची नसलेली, पण मायाजाळावर इतरत्र उपलब्द्ध असलेली, मुख्यत्वेकरून मराठी माती, मराठी माणसं, मराठी मती, मराठी मानसं या मनोगताच्या मूळ गाभ्याला धरून असणारी वा इतर संलग्न विषयांवरील (महाराष्ट्र, भारत, संस्कृती, समाज...)छायाचित्रांचा दुवा देण्यासाठी ही चौकट.

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा!

              ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥


काही महिन्यांपूर्वी माहितीजालावर खालील संकेतस्थळ पाहिले.
http://groups.yahoo.com/group/gajananshegaondevoteeclub/ 
ह्यामध्ये श्री.ज्ञानदेवांच्या हरिपाठावर निरूपण वाचले होते. मनोगतच्या सभासदांना आणि वाचकांना ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील विचारांची / तत्त्वज्ञानाची ओळख व्हावी असा विचार मनात आला होता. विनायक, मंदार आणि श्रावणी ह्या मनोगतींचे प्रोत्साहन, प्रशासकांची अनुमती आणि माझ्या सद्गुरूचे आशीर्वाद ह्या त्रिवेणीसंगमातून माझ्या मनीची मनीषा  आता मनोगतवर प्रगट होवू इच्छीत आहे.आपल्यासारख्या सुजाण वाचकांचा आणि रसिकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

पुण्यातील खड्डेः तुमची मदत

मनोगती मंडळी,


पुणे शहरातील खड्डे आता माहितीच्या महाजालावर आले आहेत. या प्रश्नाचे गांभिर्य आणि आपण त्याबद्दल करु शकणारी मदत याबद्दल येथे वाचा. आपल्या जास्तीत जास्त सह्या पुण्यातील काही खड्डे आणि त्यामुळे घडणारे काही अपघात तरी टाळू शकतील. तरी कृपया दुव्यामधील अर्जातील माहिती वाचून त्यावर तुमचीही सही करा. आणि आपल्या निकटवर्तीयांनाही आवाहन करा.

कोल्हापुरी उसळ

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • दोन उकडलेले बटाटे
  • एक कप मोड आलेली मटकी, अर्धा कप भिजत घातलेले सफेद व हिरवे वाटाणे
  • प्रत्येकी एक चमचा लसूण व आलं पेस्ट
  • एक लिंबू, एक चमचा राई, अर्धा चमचा जिरं, 150 ग्रॅम गोडंतेल
  • प्रत्येकी एक चमचा धणा पावडर, हळद पावडर व गरम मसाला
  • दोन चमचे मिरची पावडर, दोन टोमॅटो व दोन कांदे

मार्गदर्शन
१. प्रथम मटकी, सफेद व हिरवे वाटाणे चार ते पाच तास गरम पाण्यात भिजत ठेवावेत.

थालपीठ आणि पिझ्झा - २

"समीर, उठ लवकर, प्रॅक्टीकल आहे केमेस्ट्रीचं...ऊठ लवकर" योग्या माझ्या कानाजवळ केकाटत होता. मी तसा जागाच होतो. म्हणजे झोपच लागली नव्हती रात्रभर. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टीकल म्हटल्यावर मला आदल्या दिवशी झोपच लागत नसे. कशी लागणार? प्रॅक्टीकलला नेमकी माझ्यासोबत एक मुलगी असायची. त्यातही ती होती कुडी पंजाबन - उंच, गोरीपान, तगडी असं तिचं व्यक्तिमत्त्व होतं. आणि सगळ्यात मोठ्ठा प्रॉब्लेम म्हणजे ती फाड-फाड इंग्रजी बोलायची. दुसरा डोक्याला ताप म्हणजे ती कायम जीन्स आणि टी-शर्ट मध्ये यायची. आता अशी मुलगी जर इतक्या तंग कपड्यांमध्ये येऊन तुमच्यासोबत २ तास प्रॅक्टीकल करणार असेल तर काय डोंबलं लक्ष लागणार आहे त्या प्रॅक्टीकलमध्ये! २ तासात मी अक्षरशः नेस्तनाबूत होऊन जात असे.

पालक थालिपीठ

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • पालकाची छोटी पाने २५-३०
  • लहान अर्धा कांदा
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • लाल तिखट, हळद, हिंग, मीठ
  • हरबरा डाळीचे पीठ
  • तेल

मार्गदर्शन

पालकाची पाने पाण्याने धुवुन घेवून बारीक चिरणे, कांदा व मिरच्या बारीक चिरुन घेणे, त्यात चविप्रमाणे लाल तिखट, मीठ व थोडेसे हळद,हिंग घालणे. या मिश्रणामधे डाळीचे पीठ व थोडे (५-६ चमचे) तेल घालणे. पीठ जास्त नको, मिळुन येण्याइतपतच घालणे. 

वेड

... म्हणजे तू हसल्यावर मीही हसणं... तुझे अश्रू माझ्या डोळ्यांच्या पळवाटेनं बाहेर काढण्याचा भाबडेपणा... तुझ्या आवजातला गोडवा कान भरून पिऊन घेणं... मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना तुझ्या नुसत्या उल्लेखानंही लाजाळूच्या पानांसारखं संकोचून चेहऱ्यावरची लाली झाकण्याची केविलवाणी धडपड... तुझ्या आजूबाजूलाच असण्याच्या जाणिवेवर माझा प्रत्येक श्वास सांभाळणं... आणि ती कसरतही अपुरी की काय म्हणून तू नसतानाही तुझ्याशी फोटोंमधून, शब्दांमधून, चित्रांमधून बोलणं... प्रत्येक गाण्यातून फक्त तुलाच गुणगुणणं... आणि त्याचबरोबर...

वाचायलाच हवे असे...

वाचायलाच हवे असे आधीच झालेले काही लिखाण या चर्चेत आपण एकमेकांना कळवू शकतो. जसं की आज प्रविण दवणे यांचा आनंदाची पूर्वतयारी हा अप्रतिम लेख माझ्या वाचनात आला, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो वाचला असेलच पण ज्यांनी वाचला नाही त्यांना वाचता यावा म्हणून इथे देत आहे.