ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? भाग २


मूळच्या ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार ह्या चर्चेतील शेवटचे पोस्ट असे होते.

>> परत तुम्ही भूतकाळात जावू नका. तुमचे ५० वर्षातील योगदान सांगा.

 

एक म्हणजे गेल्या ५० वर्षातील योगदानाविषयी बोलणे हे भूतकाळाविषयीच बोलणे आहे नाही का?
अन्य जातिंप्रमाणे गेल्या ५० वर्षात ब्राह्मणातही अनेक चांगले लोक होऊन गेले. त्यांनी मी ब्राह्मणाच्या जातीवरील कलंक पुसतो असे ठरवून चांगले काम केले असे मला वाटत नाही. जे ब्राह्मण देशाकरिता फाशी गेले त्यांनी आपल्या जातीचे नाव उज्ज्वल करायला तसे केले असे वाटत नाही. त्यामुळे गेल्या ५० वर्षातील ब्राह्मण जातीचे योगदान सांगा असा आपला आग्रह अनाठायी आहे असे वाटत नाही का?