मनोगतींनो,
इथे एक चर्चा सुरू आहे की कशा बद्दल चर्चा करावी ज्याने जरा गरम चर्चा होईल. माझ्या मते गरम म्हणते ज्यावर हिरिरीने मुद्दे मांडले जातील आणि त्याचे गुद्द्यात रुपांतर होणार नाही.
मला वाटत भारताला आणखी एका फाळणीची/पुनर्रचनेची गरज आहे. काही जणांना वाटत नसेल. आपली मते मांडा. काही मुद्दे मला वाटतात ते असे.
- स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी पण आपण त्याच मुद्द्यांवर भांडत राहतो.
- एकूणच लोक संख्या आणि वैचारिक मतभेद पाहता योग्य मार्गाने आणि वेगाने भारताची प्रगती होईलच असे वाटत नाही.
- मूलभूत व्यवस्था न बनवता सरकारे फक्त मतांचे राजकारण करतात. सगळेच एका माळेचे मणी असल्याने कोणताच राजकीय पक्ष स्वार्थी आणि ढोंगी वाटतात.
- विश्वास ठेवावा असे राजकीय नेतृत्व नाही.
- धर्म, जात आणि मग स्त्री-पुरूष असा, आरक्षणाचा न संपणारा आणि चिघळत जाणारा वाद.
हे आणि असेच इतर मुद्दे कायमचे संपवण्यासाठी भारताची जर फाळणी वा पुनर्रचना केली तर? म्हणजे ज्यांना आरक्षण हवे त्यांना त्यांचा भाग मग त्या भागाची घटना, तिथले सरकार आणि सर्व काही त्यांच्या मनाने, असेच अहिंदूंसाठी एक भाग आणि एक भाग जे आता या सगळ्यामध्ये विनाकारण भरडले जात आहेत. म्हणजे भारताचे ३ विभाग होतील. ज्याला त्याला आपल्या हवं तसं राज्य करता येईल आणि मग कोणाचा विकास सर्वात चांगला होतो ते आपोआपच दिसून येईल. भविष्यात मग कदाचित परत विलिनीकरण करता येईल आणि एक प्रत्येक जण एक धडा घेऊन एकत्र येईल व खरंच प्रगतीच्या दिशेने गतीने कुच करेल. धर्म, जात की आरक्षण? राष्ट्रोंन्नतीसाठी खरंच काय महत्वाची आहे ते सगळ्यांना कळेल.
तुम्हाला काय वाटत? असच व्हायला हवं वा माझाच मुद्दा बरोबर आहे असे काही नाही. पण चर्चा करायला काय हरकत आहे?
(राष्ट्रप्रेमी) चाणक्य