आफ्रिकन माणसाची प्रेयसी
जगात सर्वांग सुंदर स्त्री असते
त्याच्यासाठी
हीला सर्वांग सुंदर कसे म्हणायचे?
हे एक अजबच कोडे असते
माझ्यासाठी
सुंदरतेची ही सापेक्षता
नेहमीच सलत आलीय माझ्या
हृदयात
खरच सुंदरता बसली असते
प्रेमळ भाऊक पाहणाऱ्याच्या
डोळ्यात
मला काही कुरूप दिसले
तरीही मी आजकाल टाळतो
म्हणायचे
कदाचित इतरांना ते
सर्वांग सुंदर, मनोहर दिसत
असायचे
तुषार जोशी, नागपूर