द दा विंची कोड !!

मित्रांनो, कालच "द दा विंची कोड" पाहिला. एका कथेच्या आधारे ख्र्रिस्ती धर्माचा बुरखा फाडण्याचा तो एक प्रयत्न आहे असे वाटते. प्रभु येशु म्हणजे साक्षात् ईश्वर की केवळ मानव, या व्यर्थ चर्चेस दिलेले एक सुंदर उत्तर म्हणजे "द दा विंची कोड" !


ईश्वरता की मानवता ? प्रथम मानवता महत्वाची त्यानंतरच खरे ईश्वरत्व, हाच संदेश या चित्रपटाने दिला आहे. इतिहास असाच दडपून ठेवायचा की काही वेगळेपण त्यातून शोधायचे ? आणि तसे असल्यास ते स्वीकारण्याचे धाडस किती लोकांत असेल हा प्रश्नच आहे.


मित्रहो, आपण चित्रपट पाहिला असेल, तर उत्तमच ! आपली मते जरूर लिहा.


नीलेश.