नमनाला तेल किती?

 


नमनाला तेल किती? घडाभर की धडाभर?


मी शिकताना "धडाभर" असे शिकले आहे पण काही नामवंत लेखकांच्या पुस्तकात "घडाभर" असे वाचण्यात आले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला.


लहानपणी आम्हाला असे सांगितले होते की पूर्वी तेल मोजण्यासाठी एक माप असायचे, त्याला "धडा" म्हणत. जसे धान्य मोजण्याची मापे म्हणजे "चिपटे, मापटे, अधुली, पायली.. " असायची तसेच "धडा" हे तेलाचे माप होते.


हा "ध"चा "घ" कसा झाला? जाणकारांनी कृपया याबद्दल माहिती द्यावी.


मीरा