दिवाळी अंक २००९

नेता

प्रज्ञा महाजन

(ग.ह.पाटील यांच्या "देव" ह्या कवितेचे विडंबन)

नेत्या तुझे कसे, स्वार्थाचे प्रयास।
अघोरी कयास, ते बांधतो॥
खोटी आश्वासने, कावे भयंकर।
दावे बिलंदर, ज्याचे त्याचे॥
मतदारा कोण, विचारतो बरे।
खोटे नेते खरे, राजे होती॥
मतांची महती, आता सारे खुले।
जाणतो पाऊले, नेत्या तुझी॥
इतुके तू जाण, कर किंवा मर।
इथे नाहीतर, नसशील॥