दिवाळी अंक २००९

स्पर्श

सुजाता दीक्षित

काही हळुवार स्पर्शांनी
धीराचे केले आहे सिंचन
कधी मायेच्या स्पर्शाने
पुलकित झाले जीवन
काही अधिर्‍या स्पर्शांनी
सांगितली प्रणयातली रंगत
काही वखवखलेल्या स्पर्शांनी
घालवली जगण्यातली गंमत
काही आश्वासक स्पर्शांनी
जीवनाला मिळाला नवा अर्थ
कुरळ्या रेशमी जावळाच्या
स्पर्शाने झाले मातृत्व सार्थ
असे झाले स्पर्श अनेक
तरीही हवा आहे स्पर्श एक
परिसाचा,

ज्यायोगे मनाचा लोखंड
होईल सोन्याचा