ह्यासोबत
- कामथे काका ( भाग पहिला )
- कामथे काका ( भाग दुसरा)
- कामथे काका (भाग तिसरा)
- कामथे काका (भाग चौथा)
- कामथे काका (भाग पाचवा)
- कामथे काका(भाग सहावा)
- कामथे काका (भाग सातवा)
- कामथे काका (भाग आठवा)
- कामथे काका (भाग नववा)
- कामथे काका (भाग दहावा)
- कामथे काका (भाग अकरावा)
- कामथे काका (भाग बारावा)
- कामथे काका (भाग तेरावा)
- कामथे काका(भाग चौदावा)
- कामथे काका(भाग पंधरावा)
- कामथे काका (भाग सोळावा)
- कामथे काका (भाग सतरावा)
- कामथे काका (भाग अठरावा)
- कामथे काका (भाग एकोणिसावा)
- कामथे काका (भाग विसावा)
- कामथे काका (एकविसावा)
- कामथे काका (भाग बाविसावा)
- कामथे काका (भाग तेविसावा )
- कामथे काका (भाग चोविसावा)
- कामथे काका (भाग २७ वा)
- कामथे काका (अंतिम भाग ६ वा)
- कामथे काका (अंतिम भाग ७ वा)
- कामथे काका (अंतिम भाग ८वा)
- कामथे काका - अंतिम भाग (संपूर्ण)
काका पेपर वाचता वाचता सोफ्यावर आडवे झाले. सोफ्यावर झोपलेलं नीताला आवडत नाही हे, ते केव्हाच विसरले. झोपेची पेंग एवढी होती की नियम आणि आवड निवड यांचा विचार करायला शरीर तयार नव्हतं. नीताच्या लक्षात आलं की ते सोफ्यावर झोपल्येत, पण ती काहीच बोलली नाही. हल्ली ती का नरमली होती कोण जाणे. कदाचित तिरस्कार आणि तक्रार करायला ती कंटाळली असावी किंवा तिने त्यांना खरंच स्वीकारलं असावं. असो. पंधरावीस मिनिटांनी काका उठून बसले. खडबडून जागे झाले ते एका स्वप्नाने. स्वप्नात त्यांना एक बोळ वजा अंधारी गल्ली दिसली. तिथेच कुणाला तरी बांधलेलं दिसलं. कोण होतं कोणास ठाऊक, पण त्या माणसाचे हात रक्ताळलेले होते. तो जिवंत होता. इतकेच, मग रघुमल नुसताच दिसला. आणि ते जागे झाले. स्वप्नाचा अर्थ लावणं त्यांना कठीण गेलं. प्रथम त्यांनी अपराध्या सारखं इकडे तिकडे पाहिलं. नीता तिथे नव्हती. म्हणजे नीताने पाहिलं नाही तर. ते स्वतःशीच पुटपुटले. मग फ्रेश झाले. आणि नीताला चहा करताना पाहून त्यांना बरं वाटलं. आज काल नीता थोडी थोडी रोहिणी सारखी वागत होती. निदान जेवण खाण चहापाणी वगैरेच्या बाबतीत तरी. पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आता तर श्रेयाला घेऊन बाहेर जाणं कठीणच होतं. मग ते तिच्याबरोबर घरातच खेळू लागले. मध्येच चहा झाला. त्यांना अचानक स्वस्थ वाटलं. श्रेयाशी खेळणं, नीताचं बरं वागणं आणि दरोडा, दादा, सूर्या यांचा त्यांना तात्पुरता पडणारा विसर, यांनी ते हरखून गेले. हीच घडी कायम राहिली तर काय बहार येईल. काळ पुढे सरकूच नये. उद्या उजाडूच नये. म्हणजे रवी वार उजाडला नाही तर पुढचे वार उजाडणं बंद होईल. या नुसत्या कल्पनेनेच त्यांना उत्साह संचारला. अचानक त्यांच्यात झालेला बदल पाहून नीताला पण आश्चर्य वाटलं. तिच्या मनात आ लं, यांना एवढा कशाचा आनंद झालाय कोणास ठाऊक?..... काहीही असो, दोघांनाही आपापल्या परीने बरं वाटत होतं, हे काय कमी होतं? आज रमेश नऊ वाजेपर्यंत आला. आठच्या आसपास नीताने त्यां ना वाढून देऊ का असंही विचारलं. त्यांना एकद म बरं वाटलं. पण ते नाही म्हणाले. नीतातला बदल त्यांना उत्साहवर्धक वाटला. आपली अचानक रोहिणीसारखी काळजी तिला वाटलेली पाहून
त्यांना हलके वाटू लागले. तेवढ्यात त्यांच्या खिशातला फोन फुरफुरला. त्यांनी रिंगटोन मुद्दामच लावला नव्हता. म्हणजे येणारे कॉल कोणालाही जाणवणार नाहीत. फोन दादाचा होता. " काकाजी, कल रात आपके लिये एक मीटिंग रखी है आपको आना है. कल इतवार है सूर्याभी नही रहेगा. कितने बजे आनेका और कहां मिलनेका, ये मै बादमे बताउंगा. " फोन बंद झाला.
आपल्यावर दादाचा जास्त विश्वास असावा असं त्यांना वाटू लागलं. आजचा दिवस वेगळाच लागलाय की काय त्यांना कळेना. कशाबद्दल मीटिंग घेणार आहे हा? की जिथे सूर्या नाही. मग कोण कोण असणार आहे? पुन्हा एकदा ते ढवळले गेले. त्यांना रविवार नको होता तोही सोमवार सहित. पण झालं काय? रविवार आता शनिवारही बरबाद करू पाहत होता. ते झाकाळले. अजूनही त्यांना हे माहीत नव्हतं, की त्यांच्यावर सूर्याने पाळत ठेवली आहे. ते कळलं असतं तर ते मारायला घेतलेल्या कोंबडी सारखे फडफडले असते. रमेश आला.
ते सगळेच जेवायला बसले. जेवणात एकप्रकारचा उत्साह होता. जेवताना मोकळं बोलणं बऱ्याच वर्षांनी होत होतं. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे काकांचं आयुष्य जेव्हा फॉर्मात होतं, तेव्हा असा आनंद येत होता. बोलता बोलता रमेश म्हणाला, "बहुतेक माझं व्हिसाचं काम पुढच्या आठवड्यात होईल. म्हणजे लवकरच जाणं होईल. कंपनीचंच काम असल्याने फारसा प्रश्न येणार नाही. मग या महिन्याच्या शेवटी जाणं होईल" मग काकांनी विचारले, " साधारण किती दिवसांसाठी जावं लागेल? "...... "बहुतेक एक दोन महिन्यांसाठी". नीताचा चेहरा काळजीने दाटला. ते पाहून काका म्हणाले, "अगं मी आहे ना, मी करीन बरीचशी कामं. " अर्थातच तिचं समाधान झालं नाही. मग काकांचं लक्ष नाही असं पाहून आपण नंतर बोलू अशी रमेशने तिला खूण केली. काकांनी रात्र कशीतरी ढकलली. उद्याची मीटिंग उगाचच त्यांना दबाव आणू लागली.........
रविवार असाच गेला. ते सगळेच बाहेर जेवायला गेले. विशेष म्हणजे काकांनाही घेऊन गेले होते. जेवताना काकांना जरा भरून आलं. आज रोहिणी असती तर......? या विचाराने ते हेलावले. रमेशच्या लक्षात आलं. पण त्याने त्या गोष्टीला महत्त्व दिले नाही. उगाचच इमोशनल सीन नको. संध्याकाळच्या सुमाराला ते घरी आले. अजून दादाचा फोन नव्हता. त्यांनी हॉलमध्ये जाऊन रमेशला सांगण्याचे ठरवले. ते आतल्या खोलीत शिरणार तेवढ्यात त्यांच्या खिशातला फोन फुरफुरला. दादाचा आवाज आला, " काकाजी आप एक काम करो आप होटल डिलाइटमे आईये, गुड्डीके रुममे मै बैठा हूं. "....... फोन बंद झाला. रात्रीचे नऊ वाजत होते. या वेळी रमेशला काय सांगावं? त्यांना योग्य कारण दिसेना. मग ते नेहमीप्रमाणे अस्वस्थ मनःस्थितीत आत गेले. आणि उगाचच इकडे तिकडे करू लागले. रमेशला लक्षात आलं असावं, त्याने त्यांच्याकडे पाहून प्रश्नार्थक भुवया उडवल्या. त्यांना बोलायचं असेल हे ओळखून तो बाहेर आला. काका म्हणाले, "अरे, माझ्या मित्राची तब्येत जरा बिघडली आहे, त्याच्या मुलीचा फोन होता. मला जावं लागेल. मुलगी एकटीच असते, मी आज तिकडेच राहीन आणि तिकडूनच कामावर जाईन" त्यांनी मुद्दामच कपडे घालायला सुरुवात केली. म्हणजे त्याने हरकत घ्यायला नको. तरी तो म्हणालाच, " कोण हा मित्र? मी पहिल्यांदाच ऐकतोय. " मग ते घाईघाईने म्हणाले, " मागे पण मी एकदा गेलो होतो, नीताला माहिती आहे"
खोटं बोलण्याचं त्यांना एकदम टेन्शन आलं. त्याची नजर चुकवीत ते जुजबी कपडे गोळा करू लागले. तरी रमेश म्हणालाच, "नीताला माहिती आहे, म्हणजे कोण मित्र ते नाही आणि तसंही तुम्ही ठरवलंच आहे तर परवानगी घेण्याचं हे नाटक तरी कशाला? " बोलण्याला वेगळं वळण लागलेलं पाहून ते घाबरले. मग चाचरत, आवाजात खोटी नम्रता आणीत म्हणाले, "ठीक आहे तुझं काही काम असेल तर नाही जात, त्याला जमणार नाही म्हणून सांगतो " त्यांच्या तोंडावर आलेली निराशा आणि आता या वेळेला त्याला वाद नको होता, म्हणून तो म्हणाला, "जा तुम्ही, पण तुमच्या वागण्यात लपवाछपवी वाटत्ये, हे नक्की. " असं म्हणून तो आत गेला. जणू काही त्याची परवानगी मिळाली असं समजूनच ते निघाले. घराच्या परिसरातून बाहेर जाईपर्यंत त्यांची छाती धडकत राहिली. हळूहळू त्यांनी स्वतःला स्थिर केलं. आणि टॅक्सीला हात केला. रात्री नऊ सव्वा नऊच्या सुमारास वयस्कर माणूस हॉटेल डिलाइटला जातोय म्हंटल्यावर टॅक्सीवाला पाहत राहिला.
मग काका जरा कडक आवाजात म्हणाले, "अरे चल ना भाऊ, आता तुला काय वेगळ्या भाषेत सांगायला पाह्यजे का? "....... ते आत बसल्यावर तो म्हणाला, " राग मानू नका साहेब पण तुमच्यासारखा सभ्य माणूस यावेळेला तिकडं म्हणजे....... " काका म्हणाले, " बस! जास्त बोलू नकोस. " गाडी निघाली. रात्रीच्या मुंबईची चमचमणारी हवा अंगावर घेत काका निघाले. काकांच्या मागे काही अंतरावर आणखी एक टॅक्सी येत होती. त्यात काकांच्या पाळतीवर सूर्याने ठेवलेला माणूस बसला होता. काकांना याची जरादेखील कल्पना नव्हती..... हॉटेलच्या जवळच टॅक्सी थांबली. काका उतरले. रस्ता या वेळेलाही त्याला साजेश्या गर्दीने फुलला होता. हॉटेल पासून थोड्या अंतरावर दुसरी टॅक्सीही थांबली. हॉटेल नेहमीप्रमाणे ज्या कारणासाठी होते त्या कारणाने फुल झाले होते. मंद आणि मद्यधुंद वातावरणात काका शिरले. इथे येताना बाई बरोबर असायलाच हवी असा जणू अलिखित नियमच होता. म्हणून काकांना आल्या आल्या वेटरने तुमच्या बरोबर कोणी कसे नाही, हे विचारले. पण दादाचं नाव म्हणजे परवलीचा शब्द असल्याने त्यांना तो नियम लागू झाला नाही. पण सुरक्षिततेची खात्री व्हावी म्हणून हॉटेल मधील एका माणसाने त्यांच्या अंगावर हात फिरवून पाहिला आणि त्यांना सोडले. त्यांना गुड्डी कुठे बसतो हे माहीत असल्याने ते तडक त्याच्या केबिनचं दार ढकलून आत शिरले. आत दादाही बसला होता. काकांना त्याने बसण्याची खूण केली. पाच दहा मिनिटं कोणीच काही बोललं नाही. मग दादा म्हणाला, " चलिये, "....... दादा आणि काका हॉटेलच्या भटारखान्यातून इमारतीच्या मागच्या भागात आले. अतिशय घाणेरडा भाग होता तो. सगळीकडे पावसाने डबकी साचलेली होती. आणि अनेक दिवसांचा कचरा कुजण्याची घाण येत होती. तिथेच काही लोक भट्टीवर काम करीत होते. ती दादाने लावलेली दारूची भट्टी होती. तो दिसताच तिथल्या कामगारांनी एखादा मसीहा दिसावा तसा त्याला आणि काकांना लवून सलाम केला. त्यांच्या अंगावर कधी न बदललेल्या कपड्यांसारखे कुजट्ट घाण मारणारे कपडे होते. एकूण वातावरण पाहून एखाद्याला मळमळ सुटली असती. अपुऱ्या प्रकाशात पाय जपून ठेवत काका दादाच्या मागून जात होते. एका बंद खोलीचा दरवाजा दादाने उघडला आत एक टेबल आणि चार पाच खुर्च्या होत्या. मंद पिवळ्या प्रकाशात खुर्च्यांच्या रंगापेक्षा त्यांच्या अवस्थे कडे काकांचे लक्ष गेले. टेबलाजवळच्या एका खुर्चीत दादा बसला, मग त्याच्या समोर काका बसले. दरवाज्या लागला. दादाचा एक माणूस बाहेर थांबला होता. जो कोणालाही आत येऊन देणार नव्हता. थोडा वेळ काकांना देऊन दादा म्हणाला, "आपके लिये ये सब माहौल अच्छा नही है. मै जानता हूं. फिरभी आप इन चीजोंपर ध्यान मत देना. मै जो बोल राहा हूं, वो ध्यानसे सुनना. और याद भी रखना. " पुन्हा त्याने थोडा वेळ जाऊन दिला. काकांवर तो कोणता बॉंब टाकणार होता कोण जाणे. काका जरा घाबरले. ते पाहून तो म्हणाला, " आप डरना नही. होशियारीसे सब करोगे तो राज करोगे. एक बार आपका डर निकल गया तो सब आसान है. दुनियामे डरकी वजहसे अच्छे अच्छे लोग पीछे रह जाते है. " पुन्हा त्याने थोडा वेळ जाऊन देऊन त्यांची उत्सुकता ताणली. ते म्हणाले, "आप आगे तो कहिये "
"देखिये आपका और मेरा पासपोर्ट, एक नये नामसे तय्यार कर लिया है. और वैसेही दो विझा भी बनाये है. ये बैंक का काम होतेही आपको मै सूचित कर दूंगा. आप तुरंतही मेरा नरिमन पोइंट पर एक फ्लैट है वहां जाओगे. उधर एक लोकरमे मैने आपका विझा और पासपोर्ट पूरे प्लान के साथ एक पोकेटमे रखा हुवा मिलेगा. एक घोडाभी रखा है. घोडा समझते है ना आप(त्याने मध्येच विचारले त्याला काका हो म्हणाले). एक विझा दुबई का होगा और दूसरा कैनडाका होगा. बैंक का काम होनेके बाद तुरंत आप लूटका माल साथ लेकर वहॉ जाकर वहांके लोकरमे रखा हुआ बंद पोकेट लेकर मालके साथ आपके खरीदी हुई रुमपर लेके रखना है. आपको और पैसे मै दे दूंगा उससे आपको एक थाने या कल्यान साईडके देहातमे रुम खरीदनी पडेगी. ये काम आपको आनेवाले हफ्तेमेही सबसे पहले करना है. " मग थोडा वेळ थांबला. त्यांची प्रतिक्रिया अजमावण्यासा ठी त्याने त्यांच्याकडे पाहिले., मग तो म्हणाला, " ये आपको कैसा लगता है? "... न राहवून काका म्हणाले, "लेकीन दादा ये सब आपने कैसे किया? मुझे थोडी तो आयडिया देते "....... तो म्हणाला, " उसपर आप नूक्स निकालते, इसलिये कहां नही. और आपके सब सवाल मै खतम करनेवाला हूं, वो भी आजही, अभी. ".......... त्याने दारावर हाताने वाजवले. आणि किलकिल्या दरवाजातून ड्रिंक मागवले. तो पर्यंत तो सिगरेट ओढू लागला. काही मिनिटातच एक लांडा दरवाजा उघडून आत ड्रिंकचा ट्रे घेऊन आत शिरला. त्यात काकांसाठी थंड पेय्यही होते. दार लावून लांडा गेल्यावर दादा म्हणाला, " आप अभी प्लान सुनो. तो माल रुममे छिपाने के बाद आपको ऐसे शख्ससे मिलना है जिसका बाप बनकर आप कैनडा जायेंगे, नये नामपर. पैसे सब दिये हुवे है. उस लडके से जाकर मिलना है इसलिये की आपकी उससे जान पहचान हो वो भी आपको जाने की उसका नया बाप कौन है. मै बैंकका काम पूरा करते ही कैनडा जा राहा हूं. आपको यहॉ रहकर लूट का माल दुबई जाकर मेरे बैंक खातेसे मुझे कैनडाके बैंकमे ट्रान्स्फर करना है. इसलिये आपको दुबई का विजा भी दिया जायेगा. आपको कोंटेक्ट करना मेरा काम है. और कभी कितना पैसा भेजना है ये बताउंगा. लेकीन एक बात याद रखना, सूर्यासे बचके रहना. वो आपको बिलकुल नही चाहता. इसलिये तो आपको घोडा दे राहा हूं. बाकी स्टेज तो तय्यार किया है अभी आपको अपना किरदार निभाना है. जरा भी गलती बहोत महंगी पडेगी आपको और मुझेभी. अब आप को क्या डाउट है बताइए. प्लान मे जो भी खाली चिजे रह गयी है वो आपको अपनी होशियारीसे पूरी करनी है. अगले हफ्ते वक्त देखकर आपके नये लडके का नाम और पता बता दूंगा. उसे जाके मिल लीजिये "....... तो काकांच्या अनुमती साठी थांबला. काकाना या अशिक्षित माणसाच्या डोक्या चं आश्चर्य वाटलं. आपली बुद्धी नेहमी चाकोरीच्या बाहेर विचार करीत नाही हे त्यांना जाणवलं. पुढे काय बोलावं त्यांना कळेना. त्यांना शंकांपेक्षा भीती जा स्त वाटत होती.
मग चाचरत काका म्हणाले, " दादा इतना सब मेरेसे कैसे होगा? मैने ऐसा कभी कियाही नही. "
ते मनापासून बोलत होते. मग दादा म्हणाला, " वैसे भी आप किसीके पकडमे आये न आये सूर्याके पकडमे जरूर आयेंगे. जरा सोचिये.
आप जेल काटके आये है, आपको खुदके नामसे पासपोर्ट थोडाही मिलने वाला है? और विझाभी. दूसरी बात, बहोत ज्यादा पैसा तो आपको कभी नही मिल सकता. जरा सोचके बताइए. ऐसे मौके बारबार नही आते. एक बार पैसा हाथ आया तो आप शादीभी कर सकते है. आप रंडीके पास जानेवाले तो लगते नही..... वैसे बूरा कया है? पुलिसको अभीतक आपका कोई शक नही आया है. मैने आपको इसलिये तो मेरे धंदोंसे दूर रखा था. सही बताउं तो आप जैसे साधारण लोगही ये कर सकते है बिना किसिको शक आये. "....... त्यांच्या उत्तराची अपेक्षा करीत त्याने वेळ घालवला. काका काही बोलणार एवढ्यात त्याला कसलासा संशय आला की कोणीतरी त्या खोलीच्या भोवती खिडकी खाली उभं आहे, त्याने काकांना गप्प राहण्याची खूण केली. हातात पिस्तूल धरून त्याने मग हळूच खिडकी उघडली. अंधुक चंद्रप्रकाशात त्याला कुठलीशी सावली हलल्याचा भास झाला. त्याने आता दरवाज्याजवळ सरकत हळुच दरवाजा किलकिला केला. बाहेर भट्टीवरचे कामगार दिसत होते. त्याने त्यातल्या एकाला हलक्या शिटीसारखा आवाज करून बोलावले. तर मघाचचाच लांडा होता. त्याच्या कानात त्याने काहीतरी सांगितले. आणि तो परत खिडकीजवळ आला. आता ती सावली दूर जाताना दिसली. त्याने अंदाजानेच गोळी झाडली. त्या आकृतीला ती लागली असावी. मग मात्र ती आकृती जिवाच्या आकांताने पळत मागच्याच गटारांच्या गल्लीतून पळताना दिसली. ज्या लांड्याला सांगितलं होतं तो त्याचा पाठलाग करीत होता. तो होता सूर्याने पाठवलेला माणूस. पायाला गोळी चाटून गेलेली असल्याने पाय दाबून धरीत हॉटेल पासून दूर अंतरावर जाऊन त्याने टॅक्सी पकडली, आणि तो पळाला.
काकांना ह्या सगळ्या चोरट्या गोष्टी करण्याचा कंटाळा आला होता. ते एकूण या सगळ्यातून बाहेर पडायची संधी पाहत होते. पण आपण फारसे काही न करता यात गुंतले आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. आता आपल्याला दादाबरोबरच बॅटिंग करणं भाग आहे. तो म्हणाला की रन काढायची. भीती आणि अनिश्चितता यांनी त्यांचे खांदे खाली झुकले, थोडी फार थरथर सुटली. पण त्यावर ताबा आणीत ते म्हणाले, " दादा, मै पूरी कोशिश करूंगा "........ दादाने त्यांची घालमेल ओळखली असावी. तो म्हणाला, " मै समझ सकता हूं, अंदर आनेसे पहले आपकी जिंदगी एकदम सीधी थी. लेकीन अब जीना है तो ऐसेही चलना पडेगा. जरा सोचिये, आपके सर्कल के लोग आपको जीने देते थे? जो भी हुवा उसके साथ?...... नही ना? अभी आप जादा सोचिये मत, उपरवाला उसीका साथ देता है जो जिगर दिखाता है. "....... काकांना या बोलण्याने जरा धीर आला. ते थोडे स्वस्थ झालेले पाहून तो म्हणाला, " आप कल आरामसे जब चाहे ओफिस आ सकते है, फिर भी तीन बजेसे पहले मत आना. श्रीपतसे दो प्यारकी बाते करनी है. " याचा संदर्भ काकांना लागेना. ते पाहून तो म्हणाला, " छोड दिजिये. आप इस प्लान पर सोचिये, अगर आपको कुछ नया मोड सूझता है तो जरूर बताइये. अरे आप ड्रिंक तो लिजिये. "
......... त्यांनी पेय्य संपवलं. तशी तो म्हणाला, " अभी आप निकलिये" मग त्याने दरवाजा उघडून मगाशी आलेल्या लांड्याला त्यांना टॅक्सी पाहून देण्यास सांगितले. काका टॅक्सीत बसले खरे, पण कुठे जायचं हे नक्की नसल्याने त्यांनी प्रथम साधनाला फोन लावला. अकरा वाजत होते. ती झोपली असेलच असे समजून ते जरा शरमले. पण फोन लावल्यावर कसली शरम? साधनाने फोन घेतला. आवाज ओळखून ती म्हणाली, " बोला, आत्ताच अंथरूणावर पडल्ये. " ते पडलेल्या आवाजात म्हणाले, " मी आजची रात्र तुझ्याकडे राहिलो तर चालेल का? सध्या मी बाहेरच आहे. " थोडा वेळ थांबून ती म्हणाली, " ठीक आहे, या" फोन बंद झाला. तिला आवडलय की नाही याची काळजी करीत ते तिच्या बिल्डिंगजवळ पोहोचले. आजूबाजूला पाहत ते साधनाच्या फ्लॅट जवळ पोचले. बेल दाबल्या दाबल्याच दरवाजा उघडला गेला. ती आज मॅक्सी मध्ये होती. येणारी जांभई हाताने दाबीत ती म्हणाली, " एवढ्या रात्री? " दार लावीत ते म्हणाले, " सॉरी, मी आज तुला काही गोष्टी सांगणार आहे. आता कोणालातरी सांगावं असं वाटायला लागलंय. पण त्या आधी एक सांग तू ताबडतोब दार कसं उघडलंस? " ती
म्हणाली, " सोना आत्ताच झोपल्ये, ती उठू नये म्हणून मी इथेच बसून होते. " असं म्हणून ती आत जाऊ लागली. तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत विचार करू लागले. हिला सगळं सांगणार म्हणजे नक्की किती आणि काय सांगणार? आता बोललोय म्हणजे काहीतरी सांगणं भाग आहे. आपण पण असं विचार न करता कसं काय बोललो. त्यांना जरा अस्वस्थता आली. नाहीतरी बोलायला आहे तरी कोण? रमेश? नीता?
बाहेर येत साधना म्हणाली, " अरे तुम्ही अजून इथेच आहात? आज कपडे आणले नाहीत का? " काकांना तिच्या नवऱ्याचा नाइट ड्रेस दाखवीत ती म्हणाली, "पाहा हा चालेल का? " ते थोडेसे घुटमळले. तिने त्यांची चलबिचल ओळखली आणि म्हणाली, " माझ्याकडे दुसरे पुरुषी कपडे असणं कठीण आहे. "....... मग ते विचार करून म्हणाले, " ठीक आहे " तो नाइट ड्रेस घेऊन ते आतल्या खोलीत गेले आणि घालून बाहेर आले. त्यांना तो थोड्या फार फरकाने फिट बसला. ते पाहून तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काकांना वाटलं होतं, ती काहीतरी बोलेल. त्यांना मात्र साधनाच्या नवऱ्याचे डोळे विस्फारल्या सारखे उगाचच दिसले. त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांच्या साठी तिने खाली गादी घातली होती. त्यांच्या मनात आलं मगे एवढी जवळीक झालेली आहे मग हा दुरावा का? पण ते काहीच न बोलता अंथरूणावर पडले.
तिच्याही मनात यांना आपण बेडवरच झोपायला सांगायला हवं होतं का? असे आले. पण तीही काही बोलली नाही. लाइट बंद करून झाल्यावर ती म्हणाली, "तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना? " ते विचार करीतच होते. हिला काय सांगावं? आपण दादासाठी काम करतो.
सूर्या वकील नाही, आणि पुढच्या आठवड्यात बँकेवर दरोडा पडणार आहे, रमेश कॅनडाला जाणार आहे, आपला देशाबाहेर जाण्याच प्लान, यातलं नक्की काय सांगाव? कुठून सुरुवात करायची. आपण आत होतो तेव्हापासून? प्रश्नांच्या गोतावळ्यात ते हरवले. ते बोलत नाहीत असे पाहून ती म्हणाली, " जाऊ द्या, तुम्हाला नसेल सांगायचं किंवा सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू. " असं म्हंटलं की समोरचा माणूस सामान्या असेल त नक्की सांगतो. आणि काका सामान्यच होते. मनाची भरलेली टाकी ब्लॅडर सारखी दाबत होती. आणखी किती दिवस लपवून ठेवणार? त्यांच्या मनात आलं. बॅड इज टु बी अडव्हर्टाइज्ड. म्हणजे मदत मिळते. मग त्यांनी उठून लाइट लावला. तिच्या जवळ ते बेडवर बसले. आणि अथ पासून इति पर्यंत त्यांनी दरोडा आणि त्यांचं जाणं सोडून सर्वकाही सांगितले. ती क्षणाक्षणाला स्तंभित होत गेली. काकांची झोप तर गेलीच होती, त्यांनी तिचीही झोप घालवली असावी असं वाटून ते म्हणाले, " सॉरी, तुला डिस्टर्ब केलं........ " पुढचे बोलणे त्यांनी अर्धवट सोडले. सगळं ऐकून ती काहीच बोलली नाही. तेव्हा काका न राहवून म्हणाले, " तू... तुला यावर काहीच बोलायचं नाही? " एक सुस्कारा सोडत ती म्हणाली, " माझ्या आयुष्यात सरळ असं कोणी येतच नाही. मला वाटलं होतं दिवस बरे येतील. आपल्याला आधार सापडला. इथे तुम्हालाच माझा आधार पाह्यजे. " थोडावेळ थांबून ती म्हणाली, " जाऊ द्या झोपू या आपण. " लाइट बंद झाला काका त्यांच्या अंथरूणावर पडले. ती या सगळ्याचा काय विचार करीत असेल, या विचारानेच त्यांना झोप येईना........
बराच वेळ गेल्यावर तिने अंधारातून प्रश्न फेकला, " तुम्ही नरेश गडाच्या कामाला नाही का म्हणालात? निदान असलं धोकादायक वातावरण तरी नाही तिथे. ".... उत्तराची ताबडतोब अपेक्षा असल्याने तिने त्यांना झोपलात का? असं विचारलं. त्यावर ते " मला त्याचा ऍप्रोच आवडला नाही. "....... " हो, पण मी सांभाळून घेतलं असतं की, तसं मी म्हंटलं ही होतं. " आता ते काहीच बोलले नाहीत. भूतकाळातले निर्णय बदलू शकत नाही त्याच्या मनात आलं. आणि ज्या मार्गावर जायचं त्यावर तो आपोआप येतो हेच खरं. त्यांचं मन त्यांना कुरतडू लागलं. मग त्यांनी विचार केला, आहे त्या परिस्थितीचा विचार आपण केला पाहिजे. बाकीचे विचार ओसरल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. ती अजूनही जागी आहे का? त्यांनी मनात प्रश्न विचारला. मग पाणी पिण्याच्या निमित्ताने त्यांनी परत एकदा लाइट लावला. पण तिचे डोळे मिटलेले होते. पाणी पिण्यापेक्षा तिच्या जवळ बसून आपण तिला समजावलं तर? काय समजावणार? आपल्याला तिची जवळीक हवी आहे हा इतका वेळ दाबलेला हेतू उसळी मारून वर आला. उगाच समजावण्याचा मुलामा कशाला पाहिजे? किंबहुना आपल्या मनात हे घरातून निघतानाच होतं. अकरा वाजल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ शकत होतो. त्यांना तसेच उभे पाहून तिने डोळे उघडले. ती म्हणाली, " काय पाहताय? उठलातसे? काही हवंय का? " ताकाला जाऊन भांडं लपवल्यागत ते करीत असल्याचं तिने ओळखलं. तिने त्यांच्याकडे पाठ केली. ते चडफडले. घाबरट आहोत आपण. आपणच पुढाकार घेऊन तिचे पुढचे प्लान्स काय आहेत ते विचारायला हवेत.
थोडं स्पष्ट बोललं तर आपल्यालाही आशेवर बसायला नको. अजूनही वेळ गेली नाही. आतून पाणी आणावं आणि दिवा विझवण्यापूर्वी तिच्याजवळ बसावं. म्हणजे काहीतरी संवाद होईल आणि आपल्याला तिचा स्पर्शही अनुभवायला मिळेल. त्यांनी मनाला जास्त विचार करण्याची संधी न देता ते आतून पाण्याची बाटली घेऊन आले. आणि सरळ तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आपल्याकडे वळवीत ते बिछान्यावर बसले. तिला हे अपेक्षित होतच. त्यामुळे ती काही बोलली नाही. पण ती वळल्यावर म्हणाली, " झोपा आता, रात्र फार झाल्ये, उद्या बोलू. " त्यांना बोलायचं कमी आहे आणि सहवासात जास्त रस आहे हे तिने त्यांच्या डोळयात दिसणाऱ्या निराशा आणि राग यांच्या मिश्रणातून ओळखले. ती परकी असल्याचं त्यांना जाणवलं. रोहिणी असती तर असं बोललीच नसती. ते उठण्यासाठी मागे सरले, पण तिने ते नाराज होऊ नयेत म्हणून हात हातात घेऊन म्हणाली, " खरंच उद्या बोलू. " तिथेच तिने चूक केली. तिचा स्पर्श त्यांना पेटवून गेला.
उठण्याचा विचार बाजूला सारून त्यांनी तिचे दोन्ही खांदे धरले व तिचे चुंबन घेण्यासाठी ते खाली वाकले. हळुवार आवाजात म्हणाले, "साधना उद्या मला यायला मिळेल की नाही माहीत नाही. " आता तिने उत्तेजित होत त्यांना जवळ ओढले. उबदार श्वासात दोघांनाही वेळेचं भान राहिलं नाही. भर प्रकाशात मग दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. बाहेर पावसाची जोरदार सुरुवात झाली. थंड वारा दोघांनाही अविचारी बनवीत राहिला. पहिला बहर ओसरल्यावर तिच्या लक्षात आलं की दिवा विझवायला हवा. तिने अर्धवट सुटलेल्या कपडे सावरून त्यांना दिवा विझवायचा इशारा केला. तत्परतेने त्यांनी दिव्यालाही आराम करायला सांगितले. पुढच्या अर्धा पाऊण तासात ओल्या धुंद शब्दांनी बेडरूम भरून गेली. पावसाला मात्र वादळी रात्रीसारखा ऊत आला होता. केव्हातरी रात्री त्यांना झोप लागली................
तशी सकाळी उठण्याची त्यांना घाई नसली तरी साधनाला गजराबरोबर उठावं लागलं. कारण सोनाची शाळा होती. तिला उठवणं भाग होतं. आपण एकाच बेडवर आहोत हे लक्षात आलं ते सहाचा गजर झाल्याबरोबरच. साधना खडबडून उठली. तिने सोनाला उठवून घाईगर्दीने तिचा डबा वगैरे तयार केला आणि काका झोपलेले आहेत पाहून तिने त्यांना न उठवताच ती सोनाला घेऊन बाहेर पडली. पावणे सात होत होते. आजपर्यंत तिला उठायला इतका उशीर कधी झाला नव्हता. तिला स्वतःची च लाज वाटली. आपण इतक्या कशा बहकलो. असला निरुपयोगी विचार करीत तिने यांत्रिकपणाने रस्ता ओलांडला. समोरच्या फुटपाथजवळ उभ्या असलेल्या बसकडे सोनाचा हात पकडून ती धावत सुटली. सोनाला आत प्रवेश देणारा कंडक्टर म्हणाला, " अहो, तिला घेतल्याशिवाय बस जाईलच कशी, उगाचच धावत जाऊ नका. " बस खाजगी असल्याने हे शक्य झालं. ती वरमली. आणि सोनाला टाटा करून ती घराकडे परतली.
हातातल्या चावीने दार उघडीत ती एकदाची घरात शिरली. हलक्या पावसाने तिला थोडी का होईना भिजवली होती. छत्री न्यायला ती विसरली होती. आज हे असं काय होतंय? सोनाला दिलेली भाजी तिने चाखून पाहिली. त्यात मीठ अजिबात नव्हतं.......... काय चाललंय माझ? ती स्वतःशी च म्हणाली. मग ती बेडरूम मध्ये डोकावली. काका अजून झोपलेले होते. तिने आधी आजूबाजूचं आवरलं मग चहा ठेवला.स्वतः फ्रेश होऊन आली. आणि चहा घेऊन ती बेडरूममध्ये परतली. तिने आता मात्र काकांना हालवून उठवले. काका कपडे सावरीत उठले.
आत जाऊन थोड्यावेळाने परत आले. चहाचा कप हातात घेऊन ते तिच्या शेजारीच बेडवर अंतर ठेवून बसले. दोघेही स्तब्धपणे चहा घेत होते.पण नजरेला नजर भिडवण्याचं धाडस त्या दोघांना होत नव्हतं. मध्येच त्यांनी तिला विचारले, " साधना आज तुला जायलाच हवं का? आपण अजून पूर्णपणे बोललो नाही. मला तर आज तीन वाजेनंतर गेलं तरी चालणार आहे. "..... ती काहीच बोलली नाही. तिला त्यांचा किशा दादाशी आलेला संबंध अजिबात मान्य नव्हता. तिच्या भूतकाळात गेलेला किशा एखाद्या विहिरीतून प्रेत फुगून वर यावं तसा तिच्या मनात तरंगू लागला. आयुष्यातला हा योगायोग पाहून तिला आश्चर्य वाटलं. आणि भीतीही वाटली. पुन्हा आपले दिवस झाकाळणार का? या काळजीत ती बुडाली. तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालेली भीती पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. तिच्या मनात आलं. हे का आपल्या आयुष्यात आले? सगळं नीट आकारात येत होतं. नवरा गेलेला असला तरी आता तिची ती जखम खपली धरू पाहत होती. आणि मध्येच हे काय? तिची घालमेल तिच्या चेहऱ्यावर भीतीच्या स्वरूपात दिसत होती. यांना आपलं सगळं सांगावं का? इतकी जवळीक झाल्यावर असा विचार करणं कितपत योग्य आहे? विचार करायला आपण वेळ घ्यावा पण लवकरच काय तो निर्णय घ्यायला हरकत नाही. मग अचानक ती म्हणाली, "मला ऑफिसला जायलाच हवं. मीटिंग असतात. केसवर चर्चा कराव्या लागतात. बोलू आपण लवकरच. " ती बोलली खरी. पण तिला पुढच्याच क्षणी आपण फार रुक्षतेने बोललो असं वाटलं. तसा माणूस साफ मनाचा आहे........ थोडावेळ इकडे तिकडे करून ते म्हणाले, " मग मी निघू का? " त्यावर ती म्हणाली, " तीन नंतर जायचंय ना? मग जेवण करतेच आहे. जेवूनच जा ना. असे उपाशी पोटी कशाला जाता? "......... या प्रश्नासरशी त्यांना थोडी तरी आशा निर्माण झाली. काही तरी पण संवाद होईलच. मग ते म्हणाले, " ठीक आहे मी जेवून निघेन. " ती काही न बोलता नाश्त्याच्या तयारी साठी किचनमध्ये गेली. आणि ते पेपर उघडून बसले.
(क्र म शः)