मनोगताचा दिवाळी अंक

मनोगत ह्या संकेतस्थळाचा एक दर्जेदार दिवाळी अंक निघायला हवा असे सदस्य झाल्यापासून अनेकांसारखे मलाही वाटत  आले आहे. ह्या वर्षी तरी -- प्रशासनाला फारसे किंवा अजिबात न गुंतवता -- मनोगताचा एक संस्मरणीय असा दिवाळी अंक निघावा असे मनापासून वाटते. ह्या बाबत आपल्याला काय वाटते -- म्हणजे 'हा अंक काढावा की नाही' पासून 'काढल्यास 'अंकाचे स्वरूप कसे असावे' इत्यादी-- ते कळावे आणि लवकरात-लवकरात त्यादिशेने आपली योग्य पावले पडावीत म्हणून ही चर्चा. आपले मत मांडावे.