समज व सत्य

काही समजूती - काही सत्य.


लहानपणी आपल्याला 'असें करू नका'-'तसें करू नका' असं मोठी माणसें - म्हणजे आजोबांपासून ते फक्त (?) चार वर्षांनी मोठ्या असलेल्या भावंडांपर्यंत सर्वंच सांगायचे. आपल्या बालमनांला पडणारे प्रश्न व कुणीतरी येउन दिलेली त्यांची उत्तरें ह्यांने सर्वांचे समाधान व्हायचेच असे नाही. समजूती  ह्या त्यांतूनच निर्माण झाल्यात. पुढे मोठे झाल्या वर आपण आपल्या लहानांना तीच शिकवणूक देतो.


ह्या समजूती मागील सत्य काय किंवा हे समज सर्वमान्य का झाले असावेत हा प्रश्नही आपणांस सतावत असेल. काही समजूती व सत्ये येथे देत आहे...आपणांस काही अजून माहीती असल्यास ह्या सदरांत चर्चा करावी.  


१. "रात्री नखें कापू नयेंत-भूतें पाठी लागतात"-  त्या काळांत आजच्या सारखी विज नव्हती- कामे चिमण्या/कंदिला वर व्हायची तर 'नेलकटर' कुठून असणार - रात्रीच्या अंधारात ब्लेडच्या पात्याने बोटाला दुखापत होउ नये म्हणून असणार ! मग भूतांचा त्याच्याशी काय संबंध?-लहान मुलें असं काही सांगीतल्याशिवाय ऐकत नाहीत म्हणून- 


२. "रात्री केरकचरा काढू नये-लक्ष्मी जाते"- केरकचरा न काढण्यामागेही हेच कारण असावे विज नसल्याने मौल्यवान वस्तू कचऱ्याबरोबर बाहेर टाकल्या जाण्याची शक्यता!


३. "घरातील वस्तू आठवड्यातून एकदा तरी साफ कराव्या"- कोपऱ्या/कापऱ्यांतील वस्तूं जेव्हा धूळ झटकण्याच्या निमीत्ताने हलवल्या गेल्या की त्यांच्या मागे साचलेले जिवजंतू नामषेश होतात किंवा पळून जातात व त्यांचा उपद्रव व उपसर्ग होत नाही - शाळेत असतांनाची म्हण आठवा - "हात फिरें तेथे लक्ष्मी वसें".


अशाच काही समजूती व सत्यें आपणांस माहीत असल्यास प्रतिसाद द्यावा - समजूतीं मागील कारण वा सत्य माहीत नसल्यासही द्यावे कदाचीत कुणांस माहीत असेल -


माधव कुळकर्णी