शाब्दीक कोडे

एक ३ अक्षरी पक्षाचं ( उडणारा पक्षी बरं का. कुठला राजकीय पक्ष नाही ! :D )नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे घेता 'अंकुर' ला समानार्थी शब्द तयार होतो.
शेवटची दोन अक्षरे घेता 'मोठा' ला हिंदीतला समानार्थी शब्द तयार होतो.
पहिलं आणि शेवटचं अक्षर घेता 'दळलेल्या धान्यातला साधारणपणे वाया घालवला जाणारा पौष्टीक भाग' यासाठी असणारा शब्द तयार होतो.

त्या पक्षाचं नाव काय?

असेच आणखीन कोडे माहिती असतील तर सांगा.