अनुयायी / भक्त...

सध्या मनोगता वर महाराज/स्वामी यांच्या केलेल्या/ऐकलेल्या चमत्कारांवर जोरदार चर्चा झडत आहेत. अर्थातच काही मनोगती चमत्कारांच्या बाजुची तर काही जण त्यांना 'झोडपणारी'. ह्यात एक मुद्दा सुटलाय आणि तो म्हणजे या महाराज/स्वामी यांच्या भक्तांचा किंवा अनुयायांचा.
जे महाराज हयात नाहीत (गजानन महाराज/साई बाबा/ स्वामी समर्थ), त्यांना आता देवत्व बहाल करण्यात आले आहे. त्यांच्या देवळात दर्शनासाठी रांगा लागतात, लांबुन लांबुन लोकं त्यांच्या मुर्तीच्या दर्शनाला येतात. श्रीमंत देवळं म्हणून ती गणली जातात. (निरीच्छ व सर्वसंग परीत्याग केलेल्या महाराजांची देवळे मात्र श्रीमंत, हा एक आर्थीक 'चमत्कार' आहे).
आज जे हयात महाराज/देवी/स्वामी आहेत, त्यांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांच्या प्रवचनांना तुफान गर्दी असते. त्यांचे भक्त देशाच्या सिमा ओलांडून बाहेर गेले आहेत. पुढारलेल्या देशांमधील त्यांच्या भक्तांची संख्या लक्षणीय आहे. अर्थातच त्यांच्या कडे असलेली 'पुंजी' ही लक्षणीयच असणार!


एवढे अनुयायी/भक्त त्यांना कसे मिळत असतील?
सुरवातीच्या काळात प्रत्येक स्वामी / महाराज ह्यांनी काही 'चमत्कार' केले आहेत (कींवा असं त्यांचे भक्तगण सांगतात). (सत्य साई बाबांचे कथीत चमत्कार तर सर्वश्रूतच आहेत!). ह्या चमत्कारांच्या वलयाने सामान्य माणूस त्यांच्याकडे खेचला जात असेल का?
हा फक्त 'मास सायकालोजी' (मराठी शब्द माहीत नाही) चा प्रकार आहे, असं म्हणाव तर चांगले उच्च विद्याविभूषीत लोकं त्यांचे भक्त आहेत हो, ह्या सगळ्यांनी एखाद्याला गुरु करतांना विचार केला असेलच की!
ह्या महाराजांच्या / स्वामींच्या समाजसेवेने प्रभावीत होऊन अनुयायी होत असतील का? (असं असल्यास चांगलीच गोष्ट आहे!)
समाजाच्या मानसीक आधाराची गरज हे महाराज/स्वामी भागवत आहेत का? (तसं असेल तर समाजाला असा आधार का हवा आहे ह्याचा शोध घ्यावा लागेल..


तुम्हाला काय वाटतं?


(प्रश्नांकीत) राहुल