वाचा प्रत्येकाने. प्रत्येक मराठी माणसाने.

नमस्कार,

          जय महाराष्ट्र !

लोकसत्ता (२१ जाने. २००७)- हिरकमहोत्सव विशेषांक भाग: २( शिवसेनेचा झंझावात)

शिवसेना स्थापन झाली तेव्हा बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी आदर्श असे एक शपथपत्र बनवले ते पुढीलप्रमाणे शिवसैनिकांसाठी शपथ

' मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी' स्थापन झालेल्या शिवसेनेचे सदस्यत्व घेताना शिवसैनिकांना बारा कलमी शपथ पत्रावर स्वाक्षरी करावी लागे. त्या शपथेचा हा मसुदा

१. यापुढे मराठी माणसाने मराठी माणसाला पाण्यात पाहू नये. एकमेकांना मदत करावी. परस्परांनी आपला उत्कर्ष साधावा.

२. मराठी दुकानदारांकडून मराठी उत्पादकांच्याच मालाची खरेदी करावी. उत्पादक व दुकानदार यांनीही उलटपक्षी  मराठी   माणसाबद्दल सहृद्यतेचे धोरण ठेवावे.

३. मराठी माणसाने आपल्या जागा ( घरे,दुकान वा प्लॉटस) परप्रांतीयांना विकू नयेत.विकल्यास शिवसैनिकाने त्याचे नाव,पत्ता 'शिवसेना कचेरीला कळवावा.

४. मराठी अधिकाऱ्यांनी मराठी  माणसांचीच नोकऱ्यांच्या जागी भरती करावी.

५. मराठी तरुणांनी उत्तम इंग्रजी शिकलेच पाहिजे. शॉर्टहॅंन्ड ,टायपिंग शिकावे.उत्तमस्तेनो म्हणून पुढे यावे. तसेच आजच निघणाऱ्या नवनवीन तांत्रिक कोर्सकडे जाण्याची धमक ठेवावी.

६. अंगचुकारपणा सोडावा . मिळेल तिथे जावे. मग तो हाऊसिंग गाळ असो वा नोकरी असो.

७. मराठी माणसाचे होत होईल याच दृष्टिकोनातून सर्व व्यवहार कारावेत.

८. मराठी शाळा,संस्था ,आश्रम सांस्कृतिक कार्यक्रम यांनाच सक्रिय ,मदत करावी.

९. उडप्यांच्या हॉटेलांवर बहिष्कार टाकावा. स्वाभिमानी महाराष्ट्रीय मंडळींनी रस्त्यावर, फूटपाथवर विक्री करणाऱ्या उपऱ्या फेरीवाल्यांचा कसालाही माल खरेदी करी नये.

१०. आपल्या माणसांना हॉटेल वैगेरे धंधात पुढे आणणयाची व हीन न लेखण्याची बुद्धी बाणवावी.

११. आपल्या माणसाशी उद्धऱ व उर्मटपणाने वागू नये.

१२. मराठी माणसावर कुठे अन्याय झाल्यास  संघटित आवाज उठवून त्याचा प्रतिकार करावा.

काळ बदलला तशी शिवसेना बदलली आजच्या(हिदुत्ववादी) शिवनेनेत आणि जुन्या (मराठी)शिवसेनेत खुप फरक आहे. वरिल शपथपत्र पाहून जुनी शिवसेना परत हवी असे वाटते.

या शपथपत्राबाबत आपले मत प्रदर्शन करा व कालानुरूप या शपथपत्रात बदल सुचवा.

आपला

कॉ.विकि