मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस

नमस्कार,

जय महाराष्ट्र !

काही दिवसांपूर्वी गडकरीला मच्छींद्र कांबळी यांचे  'भैय्या हातपाय पसरी हे नाटक पाहिले' आणि काही प्रश्न पडले. नाटकाच्या सुरवातीसच जेव्हा भैय्या प्रवेश करतो तेव्हा तो मच्छींद्र कांबळी यांस कांबळे असे संबोधतो. तेव्हा मच्छींद्र कांबळी त्यास आय (इंग्रजी आय) घाल असे सुनावतात. तेव्हा प्रश्न पडतो कांबळे बोलल्याने ते नाटकामध्ये भडकतात का ? नाटक सुंदर आहे .मराठी माणसाला विचार करायला लावणारे आहे.

पण प्रश्न पडतो दलित(आंबेडकरवादी) मराठी माणूस आणि मराठी माणूस  यात फरक काय. मराठी संस्कृती म्हणजे नेमकी कोणती संस्कृती त्यात मराठी दलीत येत नाहीत का ? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दलित अग्रस्थानी होते. ते काय जय महाराष्ट्र बोलू शकत नाही का.

त्याच अनुषंगाने नुकत्याच महापालीकेच्या निवडणुका झाल्या त्यात शिवसेना जिंकली त्या विजयाचे. शिवसेनेने वर्णन केले मराठी माणूस भडकला भगवा झेंडा फडकला. पण मराठी माणूस म्हणजे नेमका कोण त्यात मराठी  दलित पण आला की नाही ते कळत नाही.निवडणुकीत त्या त्या प्रभागांनुसार मराठी मतदारांबरोबर दलित मराठी मतदार मोजला(धरला) जात होता का ? मुंबई शहरातील मराठी भाषिक आणी दलित मराठी भाषिक वेगळा मोजला जातो का.मराठी महाराष्ट्राच्या संस्कृतीत दलित मराठी येतो का.ते कळत नाही.

भाषा एक असली तरी दोघेही वेगळे का ?

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

आपला

कॉ.विकि