बुद्ध्यांक म्हणजे काय?

नुकतेच ई-सकाळ मध्ये मेंदू करा रे प्रसन्न हे सदर वाचण्याचा योग आला. अनेक अतींद्रिय अनुभव आणि सिद्धी या खरोखर अतींद्रिय किंवा अमानवी नसून मानवी मेंदूचीच करामत असते असं नव्या संशोधनाअंती समजलं आहे असं त्यात म्हटलंय.
हा लेख वाचून मला काही प्रश्न पडले
१)बुद्ध्यांक म्हणजे काय?
२)समाधी, चिंतन, मनन इ. गोष्टींना आपल्या समाजात, संस्कारांमध्ये एक विशिष्ट स्थान आणि महत्त्व आहे. या संशोधनानंतर त्यात फरक पडू शकेल का?
३)मेंदूची एखादी विशिष्ट क्षमता वाढवण्यासाठी काय करावे लागते? उदाहरणार्थ, मी इंटिग्रल कॅलक्युलस हा विषय संपूर्ण नव्याने शिकते आहे आणि आजवरची प्राविण्य मिळवायची मला माहीत असलेली पद्धत म्हणजे सराव. पण फक्त सराव करून या विषयात प्राविण्य मिळवता येत नसेल तर नक्की विचार कशा पद्धतीने करावा म्हणजे मदत मिळते?
४)मानसिक ताण म्हणजे काय आणि त्याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर नक्की कसा परिणाम होतो? आणि समजा एखादे आवडीचे काम केले (उदा. एखादे कोडे सोडवले किंवा गाणे ऐकले ) तर त्या ताणातून मुक्ती मिळते असं म्हणतात. हे कसं काय शक्य होतं?

यावर कोणी तज्ज्ञ प्रकाश पाडू शकतील काय?
--अदिती