मनोगत वरील बदल

नमस्कार मंडळी,


'मनोगत' ने आजपर्यंत नवनवीन बदल करीत सतत 'ताजेतवाने' संकेतस्थळ असण्याचा पुरावा आपल्या समोर सादर केला आहे. आजच अनुभवलेला 'बदल' निश्चित चांगला आहे. ह्या व्यतिरिक्त अजून कुठले चांगले 'बदल' घडावेसे आपणांस वाटतात हे जर 'निष्कपट' चर्चेने येथे नमूद केले तर हे आपले 'आवडते' संकेतस्थळ 'उत्कृष्ठ' संकेतस्थळ होईल ह्यात वादच नाही.


निष्कपट अश्यासाठी म्हटले आहे कारण, येथे कित्येक वाद हमरी तूमरी वर येऊन झालेही असतील पण त्या वादांकडे दुर्लक्ष करून जर आपण आपले पुर्वग्रह विरहीत मत मांडले तर सर्वांच्या भल्याचाच विचार होईल अशी आशा वाटते.


धन्यवाद


अजित साठे