विवाह बंधन- सक्ती की आवश्यकतः

आजच एक घटना आम्ही राहतं असलेल्या गृहसंकूलात घडली.
एका निवासी गाळ्यात (जो भाड्याने दिलेला आहे) दोन तरूण राहतं होते त्यांनी लग्न न करता साधारण त्यांच्याच वयाच्या एका मुलीला तेथे पोटभाडेकरू म्हणून ठेवल्याचे उघडकीस आले.


कार्यकारणीच्या म्हणण्यानुसार 'हे धंदे आमच्या आवारात नको, आमच्या मुलांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे'
ज्या सदस्याने गाळा भाड्याने दिला आहे त्याच्या म्हणण्यानुसार 'जोवर ही भाडेकरू मंडळी कुठलाही उपद्रव निर्माण करीत नाहीत तोवर मी त्यांना येथून जावे असे कुठल्या आधारावर सांगू शकतो ?'


हे वादाचे मुद्दे बाजूला ठेवल्यास आजच्या युगात ही परिस्थिती निर्माण का व्हावी की, एक अविवाहित मुलगी दोन अविवाहित मुलांबरोबर चार भिंतींच्या आत राहायला तयार झाली !
कदाचित तिघांचीही काहीही समस्या असू शकेल......


परंतू  येत्या काही काळांत.... दोन, पाच, दहा वर्षांत आपण विवाहपूर्व (विवाह न करता ठेवलेल्या) संबंधांना कळतं नकळत मान्यता तर देणार नाही ?
आजच्या मुलांचे नेमके प्रश्न काय आहेत ?
पैसा, करियर की कौटुंबिक समस्या ?
आपले काय मत आहे ?
ह्या मुला/मुलींच्या जागी आपली मुले असती तर आपण काय केले असते ?