बुद्धयुगाची प्रतिकृती....

 दि.३० सप्टेंबर २००६.....
स्थळ- पवित्र दीक्षाभूमी, नागपूर


दुपारची वेळ. हजारो कषाय वस्त्रधारी उपासक शिस्तीत उभे. पुज्य भदन्त सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली आठ हजार उपासकांनी श्रामणेर दीक्षा ग्रहण केली. रस्त्यांवर जिकडे तिकडे चिवरधारी श्रामणेर दिसतायत,जणू काही मी बुद्धकाळात राहत आहे.आता कुठून तरी स्वतः भगवान बुद्ध येतील आणि धम्मदेसना करतील असं वाटतंय,इतकं जिवंत वातावरण आहे.


तिकडे लक्ष्मण माने, ऍड.एकनाथराव आव्हाड यांचाही दीक्षाविधी पवित्र दीक्षाभूमीवर पार पडलाय. त्यांच्या मागोमाग विमुक्त भटक्या जमाती आणि मातंग समाजातील आमचे भाईबांधव बुद्धाच्या सद्धम्मात प्रवेश करत आहेत.


संपुर्ण भारत बुद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं,ते स्वप्न दृष्टीपथात येतंय. अजून ते अजून थोडं दूर असेल पण आम्ही त्या युगाच्या हाका ऐकतोय. मी नागपुरात बुद्ध युगाची प्रतिकृती पाहत आहे. मला माहित आहे त्यांच्या हृदया धडकी भरल्याशिवाय राहणार नाही .