मराठी शब्द सुचवा स्पर्धा-१.

प्रयोग तत्त्वावर आजपासून आपली शब्द सुचवा स्पर्धेला मनोगत वर सुरवात करू या.

कृपया मराठी शब्द सुचवण्याचा प्रयत्न करू या. कोणी शब्द सुचवला असेलच तर त्याला जास्त समर्पक शब्द सुचवला तरी चालेल.



  1. मला हा क्रॅश कोर्स करायचा आहे.
  2. उदयापासून मॉर्निंग वाकला जाणार आहे.
  3. सध्या मला फ्रेश वाटत नाही.
  4. मॉर्निंग फ्लाईट पकडायची आहे.
  5. मस्त एन्जॉय करायचे आहे.
  6. पोस्टकार्ड पाठवले तरी चालेल.
  7. थोडे ऍडजस्ट होईल का?
  8. सध्या काही प्रपोजल नाही, बघू या..
  9. मग एन्गेजमेंट कधी आहे?
  10. सध्या बरेच फास्ट लाईफ झाले आहे.

 


मनोगतवर ही स्पर्धा असल्या कारणे ही पारितोषिक नसलेली स्पर्धा आहे. त्याचबरोबर आपण रोजच्या जीवनात किती परकीय शब्द वापरत असतो हे पाहिले तर अचंबा वाटल्याशिवाय राहणार नाही.

तर करू या सुरवात...