वैज्ञानिक मंडळी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन

वैज्ञानिक मंडळी म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन असणारी मंडळी अशी सर्वसाधारण समजूत असते. कालच्या (रविवार १९ ऑक्टोबर २००८) DNA या वृत्तपत्रात मुख्य पत्राच्या पान क्र ५ वर एक बातमी आलेली आहे.

बातमी चांद्रयान मोहिमेबद्दल आहे. त्याची तयारी कशी चालू आहे, हवामान अडचणीचे ठरणार नाही आदि. त्यातच अशीही बातमी आहे की त्या वैज्ञानिकांमधील ज्योतिषांनी चांद्रयानाच्या उड्डाणाची तारीख शुभमुहूर्त आहे असे जाहीर केले आहे. तसेच, श्रीहरीकोटा येथून होणाऱ्या प्रत्येक उड्डाणाआधी त्या त्या यानाची प्रतिकृती करण्यात येते आणि उड्डाणाच्या एक दिवस आधी ती तिरुपतीच्या बालाजीचरणी अर्पण केली जाते असेही त्या बातमीत आहे.

यावर चर्चा करायची की (हताशपणे) गप्प रहायचे या विषयावरच चर्चा होऊ शकेल!