मराठी वर्तमानपत्रे

आजकाल बरीचशी मराठी वर्तमानपत्रे आकडे इंग्रजी भाषेतून लिहितात. असे का, हे मला पडलेले एक कोडे आहे.
जे लोक मराठी अक्षरे वाचू शकतात, ते मराठी आकडे वाचू शकत नाहीत असे का ती समजतात? तमिळ आणि मल्ल्याळम
भाषिक लोकांना आज त्या भाषांमधील आकडे माहीतच नाहीत. असेच उद्या मराठी भाषेचेही होईल. असे करून वर्तमानपत्रे
काय साधत आहेत?

जी गत आकड्यांची तीच शुद्धलेखनाची.
लोकांची भाषा सुधारण्याऐवजी वर्तमानपत्रांमध्ये आज स्वतःची भाषा बिघडवण्याची चढाओढ लागली आहे. हे कधी आणि कसे
थांबणार? सकाळ, लोकसत्ता यासारखी आघाडीची वर्तमानपत्रे इतके अशुद्ध लेख प्रसिद्ध करत आहेत, की माझी स्वतःची भाषा बिघडू नये
म्हणून ते वाचणे बंद करण्याची वेळ आली आहे.

केवळ वर्तमानपत्रान्ना का दोष द्यायचा? आपली सह्याद्री वाहिनीही तेच करते आहे.
अश्या प्रकारे मराठी भाषेची लक्तरे वेशीवर टांगणे माध्यमांनी बंद करावे ही माफक अपेक्षा.