समस्यापूर्ती (८)

ह्यावेळी शार्दूलविक्रीडित हे वृत्त पाहू.


गण- म स ज स त त ग


लगावली- गागागाललगा, लगाल ललगा, गागाल गागालगा

उदाहरणादाखल बालकवींची संक्रांत ही कविता पहा.


त्यांचे सुं । दर चि । त्र हीच । मजला । संक्रांत । ही दावि । ती
गागा गा । ललगा । लगाल । ललगा । गागाल। गा गाल । गा


मंगलाष्टकं याच वृत्तात आहेत.


समस्या-


--------------------------------
------------------आहेर मोती दहा!

पहा बरं प्रयत्न करून...


टीप- आहेर, मोती, दहा हे तिन्ही शब्द वेगवेगळ्या तीन संदर्भातही येऊ शकतील!!!