वाहने किती??

जगदाळ्यांच्या मालकीची वाहनांची शोरूम होती, पेट्रोल व डिसेल वर चालणारी अनेक वाहने त्यामध्ये होती, चार आणि दोन चाकी अशा सगळ्या मिळून ३०० गाड्या होत्या. अलीकडे जगदाळे ही थकत चालले होते, म्हातारे झाले होते, त्याना दोन मुले सुनील, अनिल. वेळच्या वेळी वील करावे अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. आज त्यासाठीच त्यानी वकीलाना बोलाविले होते.
सुनील ला जेंव्हा कळाले आज बाबा वील करणार आहेत, तसा तातडीने तो आला आणि त्याने सांगितले की बाबा मला तुमचे ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने मुळीच नकोयत.
तितक्यात अनिल वकील साहेबांसह तिथे पोचला. वकीलानी सांगितले की एकूण वाहनांच्या ३० टक्के इतके ट्र्क शोरूम मध्ये आहेत, त्यावर अनिल म्हणाला, "पण बाबा, आपले १५ ट्र्क आणि एकूण वाहनांच्या २० टक्के वाहने ही डिसेल वर चालणारी आहेत म्हणजे सुनील ला ती सगळी नकोच असणार ?? "
त्यावर सर्वानी विचार केला आणि ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने एकूण वाहनांच्या किती टक्के आहेत ते शोधून काढले, तितकी टक्के वाहने सुनील ला मिळाली आणि तो खुष झाला.

तर एकूण वाहनांच्या किती टक्के वाहने सुनीलनी मिळवली?