कुणी मराठी प्रतिशब्द सुचवेल काय?

मला'पझेसिव' ह्या इंग्रजी शब्दाला मराठीत नेमका प्रतिशब्द अथवा प्रतिशब्दसमूह हवा आहे. मालकी / अधिकार/ताबा दाखवणे/गाजवणे, ताब्यात ठेवणे अशा क्रियापदांच्या रूपांतून  नेमका अर्थ व्यक्त होत नाही असे वाटते. उदा. आई आपल्या मुलांच्या बाबतीत पझेसिव असते, बायको नवऱ्याच्या बाबतीत पझेसिव असते, मूल आपल्या खेळण्यांच्या बाबतीत पझेसिव असते.नक्की कोणता शब्द वापरावा?