दुटप्पीपणा की अनवधान की अन्य काही?

पार्श्वभूमीः
काही दिवसांपूर्वी आकडेवारी पाहताना सहजपणे माझ्या लक्षात कुशाग्रांची मनोगतावरील वर्षपूर्ती माझ्या लक्षात आली. त्यांच्या येथील कामाची जाहीर दखल घ्यावीशी वाटल्याने त्यांच्या अभिनंदनाचा लेख उस्फूर्तपणे लिहिला. त्यावर मिळालेली एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया ही अशी -


वैद्य - वारंवार कोणताही माणूस फक्त आणखी एक वर्ष जगला म्हणून सार्वजनिक चावडीवर अशा जाहिराती टाकणे मला तरी नळस्टॉपला "आदरणीय माननीय नामदार अजितरावजी पवारजी ह्यांना शुभेच्छा" अशा फलकांपेक्षा मला तरी काहीही वेगळ्या वाटत नाहीत.



  1. प्रशासकांनी काही दखल घेऊन मध्यम मार्ग काढण्याच्या हेतूने या आणि अशा साऱ्या चर्चा औक्षवंत व्हा!! - २ येथे हलविल्या.

  2. इतकेच नाही तर स्वतः पुढाकार घेऊन मनोगतींनी मनोगतींविषयी मांडलेली मते/सदिच्छा मी आणि माझे सहमनोगती येथे हलविल्या.

घडामोडी -
साक्षींनी विनायकांच्या वाढदिवसाचा शुभेच्छाफलक मनोगताच्या चौकात लावला.



  1. मनोगतींच्या एका मनोगतीबद्दलच्या स्नेहातून आलेल्या अनेकानेक शुभेच्छा!

  2. प्रशासकांना फलक हटविणे -- समूळ अथवा अन्य ठिकाणी -- आवश्यक वाटले नाही.

प्रश्नचिन्ह -
एकलव्याच्या कुशाग्रांना शुभेच्छा देणारा संदेश आणि साक्षींचा विनायकांना शुभेच्छा देणारा संदेश यांबाबत मनोगती आणि प्रशासक यांच्या भिन्न प्रतिक्रिया असण्यामागे काय कारणे असू शकतील?



  1. "कोण कोणास म्हणाले" यामुळे हा फरक की "दोन्ही लेखांमध्ये गुणात्मक फरक असल्याने" ही भिन्न वागणूक.
    (ज्या मनोगतींची दोन्ही ठिकाणी एकच भूमिका होती त्यांच्या बाबतीत हा प्रश्न गैरलागू!)

  2. पुन्हा वैद्य उवाच - "तथ्य जुन्या मनोगतींच्याविरुद्ध असले की प्रशासक बडगा उगारतात हे ध्यानात आले आहे." हे खरे आहे असे म्हणायचे काय?

खुलासा -



  1. व्यक्तिगत पातळीवर या लेखात उल्लेख केलेल्या कोणत्याही मनोगतीविषयी -- एकलव्य, कुशाग्र, साक्षी, विनायक, वैद्य, आणि प्रशासक -- आकस वा प्रेमाने हे लिखाण नाही.

  2. प्रशासकांसह इतर मनोगतींचे मौन धक्कादायक नसेल. काही कृती व्हावी अशी अपेक्षाही नाही. सकारात्मक पाऊल मात्र नक्कीच स्वागतार्ह असेल.

  3. माझी या फलकांबाबतची भूमिका येथे आधीच मांडली आहे. शुभेच्छा/अभिनंदन संदेश  पुरवणी... आयुष्यमर्यादा