पाकक्रिया ही पंचेंद्रियांना कवेत घेणारी कला असल्याने स्वैपाक करताना तो पदार्थ आधी पायरीपायरीने मनात करून पाहणे, कढईत/भांड्यात घालण्याच्या पदार्थांचा क्रम ठरवणे ही तयारी सतत सुरू असावी लागते.
कच्च्या मालाची पुरेशी तयारी झाल्यावर आता प्रत्यक्ष स्वैपाकाकडे.
आधी पाहू भिजविणे, मोड आणणे, मळणे.
तदनंतर लाटणे/थापणे.
मग भाजणे, तळणे/परतणे.
भिजवण्यासाठी वेळ आणि पाणी हे…पुढे वाचा
स्वैपाकघरात वावरताना पदार्थांचे प्रमाण नि भांड्यांचा आकार हा मुद्दा अनेकदा अडचणीचा ठरतो. अमूक इतक्या भाजीला किती तेल, मीठ तिखट लागेल, तमूक तितकी भाजी करण्यासाठी किती मोठे पातेले लागेल, कढईभर पिठले…पुढे वाचा
वेगळाल्या घटकपदार्थांची (कांदा, लसूण, आले, मिरची, कोथिंबीर, भाज्या आदि) खरेदीपासून काय काय उस्तवार करायला लागते?
प्रथम कांदा. पांढरा कांदा, अतिबारीक लाल कांदा,आणि नेहमीचा लाल…पुढे वाचा
स्वैपाकाची आवड असली तरी स्वैपाकघरात वावरताना अनेक साध्यासुध्या वाटणाऱ्या गोष्टी अंगी बाणवून घ्याव्या लागल्या. त्या उमेदवारीत मला शिकायला मिळालेले काही धडे खाली नोंदवत आहे.
शिरोटीप- स्वैपाक…पुढे वाचा