लेखनात परभाषिक शब्दांचे प्रमाण किती असावे?

दिवाळी अंकातली "नोकरशाही" कथा वाचली. कथा चांगली आहे यात शंका नाही. तरीपण इतक्या प्रमाणात वापरलेले इंग्रजी शब्द वाचून खरोखर हे वापरायची आवश्यकता होती का असे वाटले कारण बहुतेक शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत. उदाहरण म्हणून बघा.

कोटेशन, प्रॉडक्शन, सेल्स, परचेस, मॅडम, युनिटमध्ये , ऍडिशनल, एरियामध्ये, कमिशनर, रेव्हीन्यू फिगर्स , जस्ट अ कप ऑफ टी, अ फ्यू गुड वर्डस, एक्साईज इंपेक्टर (इंस्पेक्टर हवे), मिसेस मेनन हॅज कम. शाल आय सेंड हर इन, गुड आफ्टरनून मिस्टर, हाय हलो, पी आर , थर्सडे नाहीतर फ्रायडेला, ही इज वेलकम, रेव्हीन्यू ड्राईव्ह, नो प्रॉब्लेम, ड्यूटी, पी एल ए, ऑर्डर, डिलीव्हरी , मशीन , पेमेंट, पेयेबल, रेअरली, क्रेडिट, कॅश, व्हॅल्यू , डिमांडस, ऍसेसीला, ऑफिसात, टॅक्समधून , फॅक्टरीत , स्टेटसची, गेटवर पर्सनली रिसीव्ह, ए. सी., सुपरिटेंडंट, ड्यू रिस्पेक्ट, डायरेक्टर, बिझिनेस फर्स्ट, बॉस, सेनव्हॅट , प्लीज डू नॉट बी पर्सनल, रिझल्टस, डिपार्टमेट, नोशनल इंटरेस्ट, ऍडव्हान्सेस, पेंडिग, इज इट ट्रूऽऽ, इशू , धिस इज एक्स्ट्रा लीगल, फ्लाय ओव्हर , रजिस्टर , फाऽऽईव्ह पऽर्सन्स फ्रॉम एक्साऽऽईज हॅव कम. शाल आय सेंऽऽड देम, वेलकम टू हील्डन, बझर, रूटीन व्हीझीट , व्हीजिलन्स, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन , आय कार्ड प्लीज, डायरीत , लेटर, पार्टीला, पर्पज ऑफ व्हीझीट , सुपरिटेंडंटशी, कॉपी, ओरिजिनल, रेकॉर्डस, एक्साईज अकाऊंटसपैकी लिस्ट ऑफ रेकॉर्डस, डेली प्रॉडक्शन रिपोर्ट, आर. जी. वन, पी. एल. ए, सेनव्हॅट रजिस्टर, इनपुट स्टॉक रजिस्टर, जॉब वर्क रजिस्टर, आणि फिनान्शिअल अकाउंटसपैकी कॅश बुक, बॅंक बुक, बॅंक स्टेटमेंट, सेल्स रजिस्टर, जी. एल., पर्सनल लेजर, गेटवरचे मटेरिअल इनपुट रजिस्टर, आणि इतर प्रायव्हेट रेकॉर्डस. "कॅबिनमधले, टेबल , कोटा, वी शाल फाईट ऍंड वीन, व्हीझीट बुकही , रॅंडम इन्व्हेस्टिगेशनला , अर्जट, सीओडी (डिलीव्हरी अगेस्ट पेमेट), डायरेक्टली, मेल वा फॅक्स , कॉंप्यूटर, लाईन ट्रान्स्फर , प्राईस , प्लस प्लस , ऑपरेटर, कस्टमरचे कॉल्स , डिरेक्टली (कधी डायरेक्टलीपण), स्टाफही , रिफ्यूज्ड टु साईन , कन्सल्टंट, स्टोअर्सचे , स्टोअर कीपर , एंप्लॉयी, नॉन सेनव्हॅटेड,  स्टॉक रजिस्टर,  मेंटेन, ऍक्शन , 'व्हेक्सेशस बिहेवियर',  'कोअर्सिव्ह मेझर्स' , सेक्शनखाली,  रूलखाली , आय कॅन ऑल्वेज अर्न माय ब्रेड इन अ रिस्पेक्टेबल मॅनर, टेस्ट रन, डेली प्रॉडक्शन रिपोर्ट इज नॉट मॅंडेऽऽटरी ऍंड जस्ट नॉट पॉसिबल. ", एक्साईज लॉ मॅन्युअल ,

आता या शब्दांऐवजी मराठी शब्द योजणे अगदीच अशक्य होते का?

आपली या विषयावरची मते जाणून घ्यायच्या उद्देशाने हा प्रस्ताव लिहिला आहे.

विनायक