मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
मूग अनारकली सलाड
जिन्नस :
२ कप मोड आलेले मूग
१ कप डाळिंबाचे दाणे
१ बटाटा उकडून बारीक फोडी केलेला
अर्धा कप बारीक चिरलेली काकडी
१ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
अर्धा कप दही
मीठ, साखर चवीनुसार
पाव चमचा मिरपूड
१ चमचा जिरेपूड
१ चमचा व्हिनेगर
मार्गदर्शन :
मूग वाफवून घेणे. एका मोठ्या बाऊल मध्ये दही घुसळून त्यात मीठ, साखर, मिरपूड, जिरेपूड, व्हिनेगर घालावे. दह्याच्या तयार मिश्रणात वाफवलेले मूग, डाळिंबाचे दाणे, चिरलेले बटाटे, काकडी, हिरवी मिरची घालून एकत्र करणे.
सलाड डिश मध्ये तयार सलाड घालावे. वर डाळिंबाचे दाण्यांनी सजवावे. फिजमध्ये थंड करण्यास ठेवावे.
पौष्टिक मूग अनारकली सलाड थंडगार वाढावे.