मन हे फुले

सोनाली जोशी

मन हे फुले
फांदीवर झुले
रंगगंधाने
आभाळ माखले..

कधी बावरते कधी हासते
वा-यासंगे कधी शीळ घालते
वागते ते कसे मला न कळे
मन हे फुले फांदीवर झुले

मला जराही देईना दाद
ऐकली तू कुणाची हाक
तुला आहे कुणी मंतरले
मन हे फुले फांदीवर झुले

जरा सांग ना तुझे गुपित
स्पर्श कुणाचा हा स्मरणात
का देहात चांदणे झिळमिळे
मन हे फुले फांदीवर झुले