मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
![]() |
एक वेल्हाळ पाखरू
नभ रेखाटताना
झाले गर्भार क्षितिज
ढग ते पेलताना
आला उगवून इंद्रधनू
आकाशाच्या ओटीपोटी
या कडेची त्या कडेला
कशी सुरेख वेलांटी
त्याचा रंगही गहिरा
कसा शब्दात मावेना
संध्येच्या कातरवेळी
कसे एकटे राहवेना
ये तू होऊन पाऊस
भिजव या वाटा
जन्मभरीच्या दु:खाचा
काढ हलवून काटा