रात्र अशी...

अजब

अंधाराने घुसमटलेली रात्र अशी
जागी आहे पण विझलेली रात्र अशी...

तारे नाहित, चंद्रहि नाही रात्री ह्या
एकटीच मग हिरमुसलेली रात्र अशी...

थिजला वारा, निजली झाडे केव्हाची
शांततेमध्ये बावरलेली रात्र अशी...

प्रभाव आहे शापाचा की मंत्राचा?
भासे इतकी मंतरलेली रात्र अशी...

भयाण या रस्त्यावर नाही कोणीही
मी आहे अन्‌ ही उरलेली रात्र अशी...