अवेळीच कसे

गजानन मुळे

अवेळीच कसे आज डोळे भरू आले
आठवांचे काठ कसे ओलसर झाले

कितीदा स्वतःलाच उगाळून घ्यावे
कधीतरी आसवांनीच वाहून जावे

उभा जन्म दुभंगून कसा अंधार होतो
स्वतःचा स्वतःलाच कधी आधार होतो