काय करायचं

सोनाली जोशी

एकमेकांना काय वाटेल
कशाला हवी कटकट...
तटस्थता, इनडिफरन्स,
दुर्लक्ष वगैरे करणंच बरं..

या आणि अशासारख्या
मानापमान वगैरेच्या
सर्व गोष्टींपलीकडे
जायला
फार वेळ लागत नाही
बास्स
तुझ्याकडे एखादा
बॉम्बस्फोट..
माझ्या गावात एखादा
भूकंप,...कोसळलेलं विमान
पुरेसं आहे एवढंच!

मग काय ठरवलं आहेस? सांग
तुझी तटस्थता आणि माझा अहंकार
बाजूला राहू दे, की
न्यायचा बरोबर?