लसणीच्या स्वादाचे सॅलड

वरदा व. वैद्य

लसणीच्या स्वादाचे सॅलड

जिन्नस :

लेट्यूस - १ गड्डा
गाजर - १ (मोठे असल्यास), बेबी कॅरट्स वापरल्यास ८-१०
ऑलिव तेल - अर्धा कप
लसूण - १ पाकळी
लिंबाचा रस - चहाचा १ चमचा
मीठ व मिरपूड - चवीनुसार
क्रुटॉन्स - १० (वैकल्पिक)
पार्मेजान चीझ - ३ चमचे

एकावेळी सहज तोंडात जाऊ शकेल एवढ्या आकारात लेट्यूस चिरा. एका बेबी कॅरट्सचे चार अशा पद्दतीने गाजराचे तुकडे करा. मोठे गाजर वापरणार असल्यास आधी ते सोला आणि मग त्याचे एकावेळी तोंडात सहज जाऊ शकतील अशा लांबी-रुंदीचे तुकडे करा.
लसूण किसून तो गोळा ऑलिव तेलात मिसळा. त्यात लिंबाचा रस घाला आणि चमच्याने नीट ढवळून घ्या.
मोठ्या वाडग्यात चिरलेला लेट्यूस आणि गाजर घाला. त्यात चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. ऑलिव तेल, लसूण आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण त्यावर ओता. सगळीकडे हे मिश्रण नीट लागेल अशा पद्धतीने ढवळा. वरून क्रुटॉन्स आणि पार्मेजान चीझ घालून पुन्हा ढवळा आणि वाढा.