मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
भरले पापलेट
जिन्नस :
५-६ पापलेट
१ वाटी ओले खोबरे
१ मोठया लसणीच्या पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ मूठ कोथिंबीर
अर्धा इंच आले
हळद
मीठ
रवा
तेल
क्रमवार मार्गदर्शन -
ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे कमीतकमी पाणी घालून वाटण करा. वाटण घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.
पापलेटांना त्यांच्या पोटाच्या कडे पासून बरोबर मध्यभागी धारदार सुरीने फोटोत दाखवल्या प्रमाणे चीर पाडा आणि पोटातील घाण काढून पापलेट साफ करून धुवून घ्या. धुतल्यावर त्याला चिरेत व बाहेरून मीठ व लिंबूरस लावा. आता ह्या पोटाच्या चिरेत वरील वाटण दाबून भरा.
एका ताटात थोडा रवा घेउन त्यात पापलेट हलक्या हाताने उलथे पालथे करा. तव्यावर तेल चांगले गरम करून त्यात पापलेट तळण्यासाठी सोडा. आंच मध्यम ठेवा. ५-६ मिनीटे एक बाजू चांगली खरपूस भाजून झाली की पलटी करून दूसरी बाजू शिजत ठेवा. ती पण ५-७ मिनीटे चांगली खरपूस तळू द्या. पण गॅस मोठा ठेऊ नका नाहीतर पापलेट करपेल. भरले पापलेट गरमागरम वाढा.