ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
हृदयविकारः ३-श्वसनक्षमता संवर्धन
इतर रोगांमध्ये जसे स्टेथोस्कोप छातीवर लावून निदान करतात, त्याउलट हृदयविकारात पाठीवर स्टेथोस्कोप लावून श्वसनक्षमतेचे निदान करतात. श्वसनक्षमता ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये १५ टक्केपर्यंत असू शकते, सामान्य लोकांत ती पाच ते दहा टक्के असते तर हृदयरुग्णांमध्ये ती २.५ टक्क्यांपर्यंत घटलेली सापडते.
कापडी टेपने छातीत पूर्णपणे श्वास भरून घेऊन छातीचा घेर मोजावा. समजा तो 'भ' सेंटीमीटर आहे. कापडी टेपनेच छातीतील उच्छवास पूर्णपणे निष्कासित करून छातीचा घेर मोजावा. समजा तो 'र' सेंटीमीटर आहे. तर भ उणा र भागिले र ह्या संख्येस शंभरने गुणल्यास टक्क्यांमध्ये श्वसनशक्ती मिळते.
ही श्वसनशक्ती कुणीही, कधीही मोजू शकतो. ती वाढवावी. वाढल्याची नोंद ठेवावी. असे नेहमी केल्यास अवनतीकारक रोग आसपासही फिरकणार नाहीत.
श्वसनशक्ती कशी वाढवावी? उत्तरः प्राणायामाने. योगासनांनी. व्यायामाने. मात्र हे सारे करण्याचे प्रयोजन श्वसनशक्ती वाढविणे हे असले पाहिजे.
३० अधिक वयात छातीचा पिंजरा पूर्णपणे तयार झालेला असतांना श्वसनशक्ती वाढते कशी? तर आपण छाती जास्त फुगवून अधिक प्राण भरून घेऊ शकत नसलो तरीही छाती पूर्णपणे रिकामी करून अंतरंगातील साठलेला कर्बद्विप्राणिद पूर्णपणे निष्कासित करण्यात यशस्वी होतो. आपली छाती जास्त मोकळी होऊ लागते. आणि श्वसनशक्ती वाढू शकते. हेच साधण्याचा भरकस प्रयत्न करावा.