ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
हृदयविकार-२० प्रगतीशील शिथिलीकरण
प्रस्तावनाः
इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः
हा वैद्यकीय अथवा प्राणायामविषयक सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
टीपः
इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील. ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत. त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही. मात्र ती साधकबाधक चर्चा इतरत्र चर्चाविषय उघडून करावी.
शरीर दैनंदिन जीवनात अनंत ताणतणावांचा सामना करते. त्यांच्यातून मुक्ती मिळविते. न जमल्यास त्यांना शरण जाते. तेव्हा ते ताण, मान, खांदा, पाठ, कमर, गुढघे, घोटे इत्यादी आणि इतरही सर्व अवयवांमधून अवघडून राहतात. त्यांना मुक्तीची अपेक्षा असते. विशेषतः जे निदानित हृदयरुग्ण असतात त्यांच्यात तर ताणतणावांना शरण जाण्याची प्रवृत्ती घडत जाते. म्हणून रोगग्रस्त, अस्वस्थ, अवघडलेल्या स्थितीत कुठलेही इतर व्यायाम, प्राणायामादी प्रकार करण्याआधी शरीर पूर्णतः सैलावण्याची गरज असते. हे साधण्याच्या प्रक्रियेस प्रगतीशील शिथिलीकरण उपयोगी ठरते.
प्रगतीशील शिथिलीकरण म्हणजे एक एका अवयवास मार्गदर्शनाखाली तणावमुक्त करत, सावकाश संपूर्णरीत्या सैलावणे. यासाठी शवासनाच्या स्थितीत उताणे पडून राहून सांगितलेल्या अवयवास ताण देऊन सैल सोडणे असे पायाच्या बोटांपासून कपाळावरील आठ्यांपर्यंत करत गेले की शरीर सैलावते. ह्यामध्ये जाणीवपूर्वक ताणून सैल सोडण्याने आखडलेले सांधे मोकळे होण्यास मदत होते.
डॉ. बालाजी तांबेंनी काढली आहे तशाप्रकारच्या योगनिद्रा सीड़ींचाही उपयोग होऊ शकतो. डॉ.राजेंद्र बर्वे ह्यांचे एक पुस्तक आहे, 'तुमची झोप तुमच्या हाती'. त्यामध्येही मार्गदर्शनासह आणि स्वतःहून केलेल्या शिथिलीकरणाच्या प्रक्रिया दिलेल्या आहेत.
अवघडलेल्या शरीरभागाकडे मनाचे लक्ष वेधून, जाणीवपूर्वक तेथे साखळलेले तणाव शिथिल करणे हाच ह्या सर्व प्रक्रियांचा उद्देश असतो. असावा. मात्र, हे साधल्यानंतरच इतर आरोग्यसाधनेचे शारीरिक कार्यक्रम अंमलात आणावेत. तर ते यशस्वी होऊ शकतात.