दागिने

भाषा ही मुळातच सुंदर असते. पण दागिन्यांनी एखाद्या सुंदरीचे रूप आणखीनच खुलून दिसावे तसे काही गोष्टींमुळे भाषेचे सौंदर्यही खुलून दिसते. म्हणूनच तर अश्या गोष्टींना भाषेचे दागिने - 'अलंकार' म्हणत नसावेत? 


भाषेचे काही अलंकार आठवत असतील तर येथे लिहा. उपमा, उत्प्रेक्षा, शब्दालंकार, अर्थालंकार आणखी काय काय असते कुणास ठाऊक!