अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांची अनेकवचने

काही दिवसांपूर्वी 'कॉमेंट' हा इंग्रजी शब्द मराठी शब्द असल्याप्रमाणे वापरायचा होता. तेव्हा त्या शब्दाचे अनेकवचन कॉमेंटी असे करावे की कॉमेंटा असे करावे असा प्रश्न पडला.

लाट - लाटा, वाट - वाटा, खाट - खाटा, माळ - माळा, वेळ - वेळा  तसे कॉमेंट - कॉमेंटा

की

गोष्ट - गोष्टी, फट - फटी, कमान - कमानी, वेल - वेली, चाल - चाली, डाळ - डाळी तसे कॉमेंट - कॉमेंटी ?

अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांचे अनेकवचन कसे करावे ह्याचे नियम कोणते?