तांत्रिक माहिती

आपण संगणक वापरत असताना आपल्याला काही अडचणी येतात. त्या कशा प्रकारे सोडवाव्यात हा प्रश्न असतो. काही वेळा असे आढळते की ती समस्या आपल्या मित्राने सोडविली असते किंवा त्याला त्यातून मार्ग मिळालेला असतो. मग तो म्हणतो, अरे .. ह्याकरिता तर असे करावे. मग आपण म्हणतो, आधी का नाही सांगितलेस?


इथे मला वाटते की ज्यांनी काही करून काही तांत्रिक समस्या सोडविल्या असतील, त्यांनी आपला अनुभव इथे लिहावा. म्हणजे पुढे एखादे वेळी दुसऱ्याला त्याची मदत मिळेल.


मी हे नमूद करू इच्छितो की जमेल तेवढा कमी चर्चा करण्याचा प्रयत्न करावा. जर काही समाधान मिळाले असेल आणि काम साध्य झाले असेल तरच इथे लिहावे.


काही माझ्याकडून मनोगत करिता
विंडोज (२००० नंतर) मध्ये एशियन अक्षर संच आणि त्यात क्लिष्ट संच (कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट) प्रस्थापित केल्यावर सर्व ठिकाणी मराठीत दिसू लागले. पुढे नोटपॅड मध्येही आपण टंकलिखित करून मग ते मनोगत वर चिकटवू शकतो. फक्त ते आपण बोलतो तसे लिहिता येत नाही . त्याकरिता पडद्यावरील कळसंचाचा वापर घ्यावा लागतो. वर्ड मधून केल्यास काही वेळा फाँट ची समस्या येते. नोटपॅड मध्ये लिहून ठेवण्याचा फायदा हा की तिथून आपण लगेच मनोगत वर
चिकटवू शकतो. आणि ते आपण युनिकोड प्रकारात डिस्कवर साठवून ठेवू शकतो. त्यामुळे जर एका लिखाणात काम होत नसेल तर पुढील वेळी त्यापुढे लिहिणे चालू करू शकतो.


आणखी नंतर...


-देवदत्त