गीतेत एका उपदेशात सांगितले आहे की दोषयुक्त स्वधर्म हा सुआनूष्ठीत परधर्मा पेक्षा श्रेष्ठ आहे.
श्रेयान् स्वधर्मो विगुणः ,परधर्मात् स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः ,परधर्मो भयावहः ॥
पण आपण नेहमी म्हणतो की दुसऱ्याचे चांगले गुण घ्यावे, आणि वाईट गुण सोडून द्यावे. तर हा उपदेश आपल्या मतांशी परस्पर विरोधी वाटतो. कोणी जाणकार या उपदेशावर प्रकाश टाकू शकतील काय ?