संस्कृत - संस्कृत अध्ययन ही काळाची गरज ?

संस्कृत - सर्वात प्राचीन भाषा आणि सर्व भाषेची जगत जननी म्हणून सर्वांनी गौरवलेली आहे.

भाषा म्हणजे त्यात गेय (गाण्यास योग्य),  मधुर अशी सुभाषिते (वचने) येतात. सुभाषिते - अल्पाक्षरी सुंदर बोधपर वचने, सुभाषिते जरी अल्पाक्षरी  असली तरी ती मोठा अर्थ सुचवतात

प्राचीन युगात संस्कृत हि बोली भाषा म्हणून वापरत असत, म्हणूनच प्राचीन भारतीय इतिहासात  संस्कृत हि भाषा आढळते .तसेच  प्राचीन साहित्य (गद्य , पद्य, ग्रंथ , वचने ,  श्लोक) हे संस्कृत  भाषेत आढळतात आणि सर्व आध्यात्मिक , वैज्ञानिक , धार्मिक  ग्रंथ हे संस्कृत भाषेत आहेत.

आयुर्वेदादी, व तसेच इतर विद्या शाखांच्या अध्ययनात संस्कृत भाषेच्या अध्ययनाचा फायदा होतो.

नुकत्याच जगप्रसिद्ध तज्ज्ञांच्या मते  संगणकास अतिशय उपयुक्त व अत्यंत जवळची अशी भाषा म्हणजेच  "संस्कृत " 

त्यामुळेच पाश्चिमात्य विद्यापीठामध्ये स्वतंत्र संस्कृत अध्ययन विभाग सुरू  केलेली आढळतात. परंतु  संस्कृत भाषेचा उदय झालेल्या भारतात मात्र मोजकेच असे संस्कृत अध्ययन विभाग आढळतात. 

माझ्या मते जसे इंग्रजी हे बालवाडी , पहिली..... तसेच सर्व विद्या शाखेत वापरले जाते तसेच संस्कृत भाषेचा वापर व्हावा.

नाहीतर योग , ध्यान , आध्यात्मिक उपयुक्तता ह्या गोष्टी जश्या "मेडिटेशन" , "स्प्युरिचलायजेशन" म्हणून आपल्याला सध्या ऐकावयास मिळतात तसेच काहीतरी संस्कृत भाषे विषयी ऐकावे लागेल.

म्हणूनच मला वाटते संस्कृत अध्ययन हि खरीच काळाची गरज आहे.