मराठी विशेषनामे इंग्रजी लिपीत लिहताना....

मराठी विशेषनामे इंग्रजीत लिहल्यानंतर ती वाचाताना अ-मराठी माणसे खूपच चूका करुन ठेवतात. 'काळे' चे 'काले' होणे अगदी सामान्य गोष्ट! पण लटूर, पन्वेल, चिप्लुन, मुलुंद, जलान, सांग्ली, केल्कार, मोदक(मोडक).... अशा अनेक गमती जमती!

त्यावर मी काही उपाय सुचवतो. 

१. स्वरपुरकासाठी स्मॉल ए आणि कान्यासाठी केपिटल ए चा वापर केला तर हा गोंधळ टळेल. उदा. सारस लिहताना SAras

२.  त, थ द ध न आणि ट ठ ड ढ ण साठी इंग्रजीत वेगळी अक्षरे नाहीत. तेव्हा आपण त थ द ध न लिहताना इंग्रजीतील स्मॉल अक्षरांचा वापर केला आणि ट ठ ड ढ ण लिहताना  कॅपिटल अक्षरांचा वापर केला तर काही अंशी अ-मराठी लोकांचा गोंधळ होणार नाही. मदन - Madan कडेगाव - KaDegAon  

विशेषनामांच्या सुरवातीचे अक्षर कॅपिटल लिहण्याची पद्धत आहे. हे लक्षात घेतले तर तासगाव  टासगाव वाचले जाईल, हे टाळण्यासाठी  ट ठ ड ढ ही अक्षरे विशेषनामांच्या सुरवातीस आली तर  कॅपिटल अक्षराखाली अधोरेखन(अंडरलाईनिंग) करावे. डहाणू शब्द DahANoo असा लिहावा.

३. ल साठी स्मॉल एल तर ळ साठी कॅपिटल एल चा वापर करावा. चितळे शब्द ChitaLe  लिहावा.

४. श साठी स्मॉल sh  तर ष साठी कॅपिटल Sh वपरावा.  वैशाख VaishAkha पाषाण PAShAN ष शब्दाच्या सुरवातीस आल्यास  ट ठ ड ढ साठी वापरलेलेली अधोरेखनाची युक्ती इथेही उपयोगी पडेल. षडानन ShaDAnana  असे लिहावे.

५. इ आणि ई तसेच उ आणि ऊ मधिल भेद  स्पष्ट करण्या साठी इंग्रजीती ल डबल ee अथवा डबल oo चा वापर करता येईल. जोशी लिहताना  Joshee लिहावे.

ही पद्धत रुळण्यापुर्वी त्रास होईल. पण एकदा रुळली की इतर भाषा भगिनीदेखील आपले अनुकरण करतील. बरे, मी काही नवेच सांगत नसून फोनेटिक इंग्रजीत लिहताना आज आपण त्याचा सर्रास वापर करत आहोतच!