चित्रपटांतील चुका...

दिग्दर्शकाची डुलकी  ह्या भोमेकाकांच्या प्रतिसादावरून मला ह्या लेखाची कल्पना सुचली.
येथे आपण आपणांस कळलेली चित्रपटातील चूक निदर्शनास आणून द्यावी.
कृपया "अंदाज अपना अपना" आणि बहुधा इतरही चित्रपटांतील मुद्दाम दाखविलेल्या चुका येथे लिहू नयेत. उदा. अंदाज अपना अपना ह्यात "दो मस्ताने चले... " ह्या गाण्यात दोघांनीही दोन्ही पायात वेगवेगळे बूट घातले आहेत. :-)



सुरुवात मीच करतोः
Mr. and Mrs. Khiladi ह्या चित्रपटात, जुही चावला जेव्हा कादर खान कडून लग्नाची परवानगी मागत असते तेव्हा ती त्याला गाडीत बसवते.
ती जेव्हा गाडी सुरु करते तेव्हापासून, ते गाडीची पूर्ण तोड्फोड करून परत येईपर्यंत, जुही चावला गाडीच्या उजव्या बाजूला बसून गाडी चालविते. (भारतीय पद्ध्तीनुसार Right Hand Drive) . परंतु, परत आल्यानंतर जेव्हा कादर खान दरवाजा उघडून उतरतो (तो दरवाजाही मोडलेला दाखवला आहे.) तेव्हा जुही डाव्या बाजूला बसलेली आहे.(Left Hand Drive)