ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
१९७३ - ७४ ला त्या शिक्षण संस्थेत एक साधन दुरुस्ती करता आले होते. क्रॅंकशॅफ्टच्या गुळगुळीत पृष्ठभागांचे मोजणी व नियंत्रण त्या साधनाने होत असे. मी साधन घेऊन येणार्या व्यक्तीला वापर कसा केला जातो वगैरे माहिती मिळवली. सगळ्यांनी हात झटकले. शेवटी प्राचार्यांनी मला आव्हान दिले. चांगले पैसे मिळतील असा विश्वास दिला.
त्या साधनाचे नकाशे कोणी जाळले होते. साधन उत्पादकाकडे जर्मनीत पाठवणे फार खर्चीक होते म्हणून ते आमच्या संस्थेत दुरुस्तीला आले होते. दोन दिवसांत मी नकाशे तयार करून सुरक्षित जागी ठेवले. नकाशा मुळे दुरुस्ती काम सोपे झाले. पुढल्या काही दिवसात कंपनीचा माणूस ते साधन घेऊन गेला. मी मिळणार्या पैशाची वाट पाहत बसलो.
दोन महिन्यानंतर एक दिवस कार्यालयातून माझ्या नावाचे पाकीट मला मिळाले. त्यात एक हस्तलिखित चिठ्ठी व २५० रुपये होते. ते क्रॅंकशॅफ्टचे साधन दुरुस्तीचे संस्थेला २५००० रुपये मिळाले होते त्याचे निम्मे संस्थेने ठेवून निम्मा भाग संबंधीत व्यक्तींना दिला आहे, त्याचे २५० रुपये रोख तुला देण्यात येत आहेत. त्या निम्म्या भागातला सगळ्यात कमी भाग माझा होता. कार्यालयातल्या कारकुनाला माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते. मी रागाने विभाग प्रमुखांना भेटायला गेलो, ते बाकीच्या फुकटात पैसे मिळालेल्या सगळ्या मंडळीनं बरोबर पार्टी करण्याचे ठरवीत होते. मी त्यांना भेटायला येणार हे त्यांना अपेक्षितच होते, अरे ये ये आम्हाला काही न करता पैसे मिळाले म्हणून पार्टी करतो आहे. मी दुर्लक्ष करीत चिडून बोललो "आपण शिक्षण संस्थेत प्राध्यापक आहात, निती नियम शिकवता, तुम्हीच नियम धाब्यावर बसवता मग तक्रार घेऊन कुठे जाणार ? " " काम मी केले, एकाही महाभागाने ह्यात मदत केली नाही, पैसे वाटपांत सगळे सामील झालात ? साधन दुरुस्त केले ही माझीच चूक"
विभाग प्रमुख कुत्सित हसत मला शिकवतो " समुद्रात मोठा मासा लहान मासा खाऊन जगतो, हे तुला समजून घेणे जरूरीचे आहे." मी पण टोला हाणला " माणूस म्हणून मिरवणारे, वळवळणारे प्राणी म्हणून जगतात हे आज तुम्हाला बघून समजले, अश्या प्राण्यांना कसे ठेचायचे हे मला शिकले पाहिजे."
पुढे काही महिन्यांनी इलेक्ट्रॉनिक विभागाला बीई नापास झालेला, प्राचार्यांचा नातेवाईक प्रमुख म्हणून आला. त्या काळात "टनेल डॉयोड" हा प्रकार बाजारात उपलब्ध नसताना ह्या महाभागाने बलसाड शहरात किलोने विकतात असे सांगत कामाचा कार्य भाग सांभाळण्याचे खेळ सुरू केले. डिप्लोमाचे विद्यार्थी शंका निरसना करिता माझ्या अवतीभवती बघून ह्याचा जळफळाट होत असे. प्राचार्यांचे सहीचे एक पत्र माझ्या हातात दिले. उपकरण बंद का झाले, कोणत्या आधाराने काय दुरुस्ती आवश्यक आहे हे ठरवले, दुरुस्ती करता कोणती हत्यारं / साधने वापरणार वगैरे सगळा तपशील लिहून काढा, विभाग प्रमुखाची मान्यता घ्या आणि नंतर दुरुस्ती सुरू करा. तिन महिन्यात लॅबमधील ५० टक्के उपकरणे दुरुस्ती करता बंद झाली. माझी तक्रार प्राचार्यां पर्यंत पोचली. सगळा तपशील वाचून दोष माझा ठरवला गेला. मला संस्था सोडा म्हणून सांगण्यात आले. उपकरणे बाहेरुन दुरुस्त करून घेण्याच्या कंत्राटावर संमती झाली. पैसे गिळण्याचे नवीन धंदे शिक्षण संस्थेत सुरू झाले.
डोक्याचा असा सुपीक उपयोग करणे मी का शिकलो नाही - - नशीब माझे - भेटूया - भाग - ९